26.2 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रभरधाव ट्रॅक्टर-दुचाकीची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रॅक्टर-दुचाकीची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

वाशिम : सेलूबाजार मार्गावर भरधाव ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने अपघात घडला. या अपघातात एकाच गावातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. बाळू लगड आणि दिगंबर देशमुख अशी मयतांची नावे आहेत.दोघांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

काटा गावातील दिगंबर देशमुख हे दुचाकीवरून वाशिमकडे चालले होते. तर बाळू लगड हे वाशिमहून काटा गावाकडे येत होते. दोघेही भरधाव वेगाने येत होते. यादरम्यान वाशिम-सेलूबाजार मार्गावर दोघांच्या वाहनांची समोरासमोर धडक झाली.

धडक होताच दुचाकीवरील दिगंबर हे रस्त्यावर लांब फेकले गेले. यात जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर धडक होताच ट्रॅक्टर पलटी झाला आणि चालक बाळू हे ट्रॅक्टरखाली दबले जाऊन त्यांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR