Homeपरभणीभरधाव हायवाची बसला धडक

भरधाव हायवाची बसला धडक

पूर्णा : चुडावा-वसमत मार्गावर भरधाव वेगातील हायवाने एस. टी. बसला जोरदार धडक दिली. सुदैवाने या घटनेत बसमधील सर्व प्रवासी बालंबाल बचावले आहेत. या अपघातात बसचे नुकसान झाले आहे. ही घटना दि. २४ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसमत एस. टी. आगारातील चालक देवानंद चांगोजी सुर्यवंशी (वय ३२, रा. देगाव ता. पूर्णा) हे शुक्रवारी सकाळी ९.२५ वाजता एम.एच. १४ बी.टी. २२४९ क्रमांकाची बस घेऊन धानोरा मोत्या येथून वसमतकडे जात होते. दरम्यान, समत फाट्यापासून २ कि.मी. अंतरावर चुडाचा शिवारात समोरून येणा-या (एम.एच २१ बीएच ७०७८) क्रमांकाच्या हायवाने बस चालकाच्या बाजुने हायवा घासत नेला.

यात बसच्या मागील दोन खिडक्या फुटल्या असून पत्रा फाटला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी हायवा चालक नामदेव दगडोबा ठोके (रा. नांदापूर, ता. जि. परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.ह. काकडे करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR