लातूर : प्रतिनिधी
जगतज्योती महात्मा बसवेश्वर महराज यांच्या जयंतीनिमित्त बसवेश्वर चौक येथे नव्या एलईडी नामफलकाचे थाटामाटात अनावरण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, उपमहापौर अॅड.स्रेहलजी उटगे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यावेळी करण्यात आलेल्या भव्य आतिषबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि उपस्थित नागरिकांनी जल्लोषात सहभाग घेतला. महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात उपाध्यक्ष विश्वास आंबेकर यांनी स्वखर्चातून एलईडी नामफलक उभारण्यासाठी मोठे योगदान दिले. शनिवारी रात्री मान्यवरांच्या उपस्थितीत या आकर्षक फलकाचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी आमदार अभिमन्यू पवार, काँग्रेसचे राज्य सचिव श्रीशैल्य उटगे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, नगरसेवक विकास कांबळे, आदिती पाटील कव्हेकर, ऋषिकेश राजे, सत्यवती ताई चेवले, शोभाताई पाटील, संगीता मिरचे, राजश्री धोत्रे, राम स्वामी, श्रीकांत रांजणकर, ओमप्पा धरणे, अॅड. गंगाधरप्पा हामणे, बसवंतप्पा भरडे, बाबुअप्पा सोलापूरे, भीमाशंकर देवणीकर, विनय जाकते, मीनाताई गायकवाड आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अॅड. निलेश मुचाटे यांनी केले, तर सूत्रसंचालन ओमप्रकाश झुरळे व ओमकार मेंगशेट्टे यांनी प्रभावीपणे पार पाडले. आभार प्रदर्शन बसवेश्वर हेंगणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. निलेश मुचाटे, स्वागताध्यक्ष प्रा. भालचंद्र येडवे पाटील, उपाध्यक्ष विश्वास आंबेकर, सचिव बालाजी झिपरे, सहसचिव रोहीत चवळे, कोषाध्यक्ष लखन कावळे, कार्याध्यक्ष मुकेश उटगे, बालाजी पाटील रायवाडीकर, गणेश हेरकर, संयोजक नितीन मोहनाळे, जगदीश येरटे, सोमेश्वर ईश्वरशेटे, शिवकुमार रोडे, प्रमोद धुपे, लक्ष्मीकांत रासुरे, मन्मथ सोरटे, सुशील वेळापुरे, निखिल शेटकार, शरणाप्पा अंबुलगे, कल्याण लातूरे, सुनील ताडमाडगे, किरण खोबरे, सतीश पाटील, महेश आंबुलगे, बसवेश्वर हलकुडे, तानाजी झुंजे पाटील, दत्ता स्वामी, दत्ता चेवले, मनोज मोटे, अॅड. सचिन हुरदळे, प्रदीप उपासे आदींसह समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. या दिमाखदार सोहळ्यामुळे बसवेश्वर चौक नव्या एलईडी नामफलकामुळे अधिक आकर्षक बनला असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

