भाऊसाहेब नव्हे, खाऊसाहेब वाकचौर म्हणा

शिर्डी : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतील सभेत त्यांच्या पक्षातून फुटून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हे भाऊसाहेब नाहीत खाऊसाहेब वाकचौरे असे म्हणत त्यांनी लोकांना आवाहन केले.

‘आपला खासदार पळालेला आहे. सापडला तर सोडू नका! आणि अजिबात परत आणू नका.’ त्याचवेळी काहींच्या रक्तात गद्दारी भरलेले असते त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वाकचौरे, अशी कडवट टीका केली. तसेच वाकचौरे जिथे जातात तिथे बट्ट्याबोळ करतात, असा घणाघाती वारदेखील त्यांनी केला. तसेच या निमित्ताने त्यांनी शहासेना आणि सुपारी सेना असा उल्लेख नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावरही टिकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी भाजपवर जहरी टीका केली.

उद्धव ठाकरे तीन दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. ठाकरे सेनेतून फुटलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात ते मतदारांची माफी मागत आहेत. त्यावेळी ते शिवसेना आणि भाजप त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्य करत आहेत. शिर्डीतील सभेतही त्यांनी फडणवीसांचा पत्ता बहुधा कापला जाणार आहे, असे सांगून २०२९ मध्ये काय होणार, याची चर्चा सुरू झाली असल्याकडे लक्ष वेधले.

तसेच या रेसमध्ये फडणवीस येऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यांचा पत्ता आताच कापण्याची सुरुवात केली आहे. त्यासाठी शाहसेनेने फोडाफोडी करणा-यांना सुपारी दिली आहे. खासदार फुटतात मग त्यांना भाजपमध्ये न घेता इतरांच्या पक्षात का पाठवले जात आहेत? हे लक्षात घ्या! महाराष्ट्रात भाजपपेक्षा शहासेनेची ताकत वाढली आहे. उद्या पंतप्रधानपदाचा निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर ते शहासेनेला मदत करतील. फडणवीसांना रोखण्यासाठी खासदार फोडण्याची शहासेनेची चाल आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

नीटचे पेपर फुटले म्हणून जंतरमंतर आंदोलन सुरू आहे, आता टीईटीचे पेपर फुटले, खासदार फुटले तरी अजून संतापाला वाचा का फुटत नाही, असा सवाल करत लातूरमध्ये शेतक-याला बैल नाही आणि आपले लोक खासदार फोडायला पैसे वापरतात. शेतक-याची बातमी आल्यानंतर सरकारने त्यांना बैल दिला. त्याऐवजी खासदार किंवा मंत्री द्यायला हवा होता, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांना वाटले ४० आमदार फुटले म्हणजे आता शिवसेना संपली, त्यांना वाटले ६ खासदार फुटले म्हणजे शिवसेना संपली. पण, शिवसेना संपत नाही, तुम्ही आमचे किती आमदार-खासदार फोडणार, असा सवाल ठाकरेंनी विचारला.

महिलांवर रोज अत्याचार होत आहेत. राज्यात मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत. मात्र, महिला अत्याचाराबाबत कुणी बोलत नाही. तरीही त्यांचे महिला आरक्षण सुरु आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होता. आता फोडलेल्या खासदारांना घेत विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून आम्हाला पक्ष पुनर्बांधणीचा प्रश्न करणा-यांना सांगतो, भाजपला पक्ष पुनर्बांधणी करण्याची गरज आहे. त्यांना उपरे लागतात. भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरावर निखारे ठेऊन पक्ष बांधला ते आज ते गद्दारांच्या पायाखाली लोळत आहेत. म्हणून भाजपला पक्ष पुनर्बांधणीची खरी गरज आहे. भाजपला राजकारणात पोरं होत नाहीत म्हणून ते दुस-याची पोरं पळवतात, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

फोडाफोडीच्या राजकारणाला बळी पडू नका
संघाला मान्य असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछाटी सुरू आहे, हे संघाला मान्य आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला केला. तसेच भाजपला संघाची गरज नाही, जेपी नड्डा यांच्या जुन्या वक्तव्याची आठवणही त्यांनी करून दिली. मराठी माणसांत मारामा-या व्हाव्यात यासाठी या सुपारी सेना, शहासेना काढल्या आहेत. आपलेच लोक आपल्यातून फोडून आपल्या अंगावर टाकत आहेत. आपण भांडत बसणार आणि राज्य ते करणार, असे सुरू आहे, याला बळी पडू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50
Video thumbnail
Latur|पाऊसानंतर आता गोगलगायींचा कहर; शेतकरी संकटात!
06:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सर्व इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट; मनपा ॲक्शन मोडवर
02:28
Video thumbnail
Kishor Jadhav Shivnikar Maharaj|पिस्तुल्या शिवणीकर महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
02:56
Video thumbnail
Solapur|सांगोल्यात १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; ३७ हजार लिटर दूध जागेवरच नष्ट
01:42
Video thumbnail
Latur|नागलगाव परिसरातील पाझर तलाव कोरडे, जनावरांवर पाणीटंचाईचे संकट
01:15
Video thumbnail
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातील विहंगम सोहळा, डोळे दिपवून टाकणारा व्हिडिओ
00:40
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16

Latest news