23.2 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपची मस्ती वाढली आहे, मी जिरवणार

भाजपची मस्ती वाढली आहे, मी जिरवणार

बारामती : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपची मस्ती वाढली आहे, मी त्यांची मस्तीच जिरवतो, असे म्हणत जानकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महादेव जानकर बारामतीच्या कन्हेरी येथे प्रचारसभेत बोलत होते.

भाजपने काय केले? शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. कुठला माणूस कुठे ठेवायचा नाही. आमचे एक-दोन आमदार होते ते आमदार पण पळवले. आमचा आमदार निवडून येतो आमच्या पक्षावर आणि तुम्ही भाजपबरोबर घेऊन जाता. आता तुमची मस्ती जिरवतो, असा इशाराच महादेव जानकर यांना दिला आहे.
माझ्या मागे लागले होते, मला फोनवर फोन येत होते. मी पण वर सांगितले माझ्या पीएसोबत बोला. महादेव जानकर तुमची सत्ता घालवल्याशिवाय पुन्हा तुमच्यावर बोलणार नाही, असा इशाराच महादेव जानकर यांनी दिला.

मी जर घोटाळा केला असता, चो-या केल्या असत्या तर माझ्याही मागे ईडी लावली असती. मला म्हणाले असते तुम्हाला आमच्याबरोबर राहावं लागेल, नाहीतर तुरुंगात टाकू. मारुतीच्या साक्षीने सांगतो, महादेव जानकर भ्रष्टाचारी नाही, असे म्हणत महादेव जानकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR