26.7 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeराष्ट्रीयभाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचा संताप

भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचा संताप

निष्ठावंत कार्यकर्ते, सीमा हिरे समर्थक संतप्त

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये भाजपमधला असंतोष चव्हाट्यावर आला आहे. आयारामांनाच झुकते माप दिल्याने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजर यांनी बाजी मारली आहे. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या समर्थकांना डावलून बडगुजर यांच्या घरात तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्वत: सुधाकर बडगुजर, मुलगा दीपक आणि पत्नी हर्षा बडगुजर यांना भाजपने संधी दिली.

यामुळे हिरे समर्थक आक्रमक झाले आहेत. जे पक्षाच्या निर्णयाविरोधात जातील त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी दिला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर केला होता. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर बडगुजर यांच्यासाठी भाजपने दार उघडले.

दुसरीकडे भाजपने ‘घराणेशाही’ला लगाम घालत आमदार देवयानी फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांना मोठा धक्का दिला आहे. नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याच्या धोरणामुळे, वाजतगाजत अर्ज भरणा-या फरांदेचा मुलगा अजिंक्य फरांदे आणि हिरे यांची कन्या रश्मी हिरे यांना अखेर माघार घ्यावी लागली. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या बडगुजरांसारख्या आयारामांना महत्त्व देण्यात आल्याने भाजपचा जुना कार्यकर्ता मात्र दुखावला गेला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR