25.3 C
Latur
Monday, November 4, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपच्या त्रासामुळे पत्नीला कर्करोग

भाजपच्या त्रासामुळे पत्नीला कर्करोग

नागपूर : भाजपने मला ज्या पद्धतीने ईडी, सीबीआयचा त्रास दिला, त्यामुळे माझ्या पत्नीला कर्करोग झाला आहे.  आजवर त्यांना १४ कीमोथेरेपीही घ्याव्या लागल्या आहेत, असा मोठा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
दरम्यान, भाजप सरकार मागील तीन वर्षांपासून माझ्या मागे लागलेय, तरी मी कुणाच्या बापाला घाबरत नाही.
मी काटोलमधून  उमेदवारी फॉर्म भरला नाही, कारण या सत्ताधा-यांनी नियोजन केले होते की अनिल देशमुख यांनी फॉर्म भरला, तर काही तरी तांत्रिक अडचणी काढा आणि तो फॉर्म रद्द करण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी खास दिल्लीतून मोठे वकीलही आणून ठेवले आहेत. जे रश्मी बर्वे सोबत झाले तसेच माझ्यासोबत करण्याचा डाव यांचा होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR