भाजपसमोर बंडखोरीचे आव्हान

विधान परिषद निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागणार
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनीही बहुतांश जागांवर आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. मात्र, उमेदवारांची नाव जाहीर होताच महायुतीत बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या बंडखोरीचा फटका अधिकृत उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. जे इच्छूक होते. परंतु ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, असे पक्षातील नाराज नेते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पुण्यासह भाजपचा गड असलेल्या नागपुरातही बंडखोरी अटळ आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ महायुतीत भाजपच्या वाट्याला आले आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपकडून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेसकडून जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे पुण्यात आता कौस्तुभ गावडेविरूद्ध जयंत आसगावकर असा सामना रंगणार आहे. परंतु या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नेते मंगेश चिवटे हे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. यासोबतच उदय सामंत यांचे समर्थक सचिन सानप हेही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तिकडे नागपुरातही माजी आमदार अनिल सोले बंडखोरी करू शकतात. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु तेथे माजी आमदार अनिल सोले इच्छुक होते. परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. नागपुरात कॉंग्रेसकडून माजी आमदार अभिजित वंजारी यांनाच पुन्हा मैदानात उतरविले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपकडून स्मिता जाधव यांना उमदेवारी जाहीर करण्यात आली तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सभांव्य उमेदवार हर्षदा देशमुख या आहेत, त्यामुळे इथे स्मिता जाधव विरूद्ध हर्षदा देशमुख असा सामना रंगण्याची शक्यता आहे. येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. भैय्या माने हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या वतीने सतीश चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार दिलीप घुगे असण्याची शक्यता आहे. मात्र, ठाकरे गटाने आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. या जागेसाठी भाजपचे संजय केणेकर मैत्रीपूर्ण लढतीसाठी इच्छुक आहेत.

अमरावतीत मविआत
बंडखोरीची शक्यता
अमरावती शिक्षक मतदार संघामध्ये आदिती पोहरे या काँग्रेसच्या उमेदवार आहेत तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने इच्छुक असल्याने इथेही बंडखोरीची शक्यता आहे. मविआच्या बैठकीत अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यताही वर्तवली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10

Latest news