22.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeलातूरभाजपाकडून सत्तेचा गैरवापर; प्रशासनही घालतेय लोटांगण

भाजपाकडून सत्तेचा गैरवापर; प्रशासनही घालतेय लोटांगण

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने दि. ७ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातुरात सभा झाली. त्यानिमित्त भाजपाने संपुर्ण शहरात मुख्यमंत्री फडणवीस यांचे  बॅनर्स लावले आहेत. मु्ख्यमंत्र्यांचे अनधिकृत बॅनर्स लावून भाजपाने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपाने शहरात लावलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनर्सना अधिकृत परवाना नाही, मुद्रकाचे, प्रकाशकाचे नाव नाही.
 परवानगी घेतल्याच्या पावतीचा क्रमांक नाही. संख्याही नाही. हे बॅनर्स लावताना आदर्श आचारसंहितेच्या एकाही सूचनेचे पालन भाजपने केले नसल्याचे दिसून येत आहे. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे आणि प्रशासनही भाजपासमोर लोटांगण घालत असल्याचे यावरुन दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व्यंकटेश पुरी यांनी बॅनर्सवर आक्षेप घेतला असून याची तक्रार निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR