22.2 C
Latur
Tuesday, September 10, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप आमदार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीला उडवले, २ ठार

भाजप आमदार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीला उडवले, २ ठार

सातारा : साता-यामधून एक मोठी बातमी समोर येत आहे, भाजपचे माण-खटाव विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने एका दुचाकीला उडवले आहे. यात दोन जण ठार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील दहिवडीजवळील बिदाल शेरेवाडी भागामध्ये ही भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी होता. त्याला उपचारासाठी रुग्गणालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या अपघातामुळे बिदाल शेरेवाडीवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर, गोरे यांच्या ताफ्यातील वाहनाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. भाजप नेते, माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे मतदारसंघात फेरफटका मारत असताना हा अपघात झाला.

दरम्यान, माझा दौरा सुरू होता. माझी गाडी गावात पोहोचली होती. एक गाडी मागे होती. ती गाडी माझ्या ताफ्यासोबत नव्हती. पण मी निघून गेल्यावर हा अपघात झाला. त्या गाडीत माझे लोक होते. या प्रकरणात पोलिस पुढील कारवाई करत आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार जयकुमार गोरे यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR