लातूर : प्रतिनिधी
मागील काळात आपन सर्वानी काँग्रेस पक्षाला भरभरून आशिर्वाद दिले आहेत. त्याच आशिर्वादाचे सोने करीत काँग्रेस पक्षाने लातूर शहर महानगरपालिकेचा चौफेर विकास केला आहे. मात्र भाजपच्या लोक महानगरपालिकेत सत्ता हाती घेऊन लातूर शहराच्या विकासाची गती थाबली. आज आपण पाहतो लातूर शहरात मोठ्या प्रमाणात घन कचरा, स्वच्छता, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न असताना भाजप सरकार फक्त योजनेच्या घोषणांचा पाऊस पाडतात. मात्र कोणतेच काम ते करीत नाहीत. त्यामुळे मतदारांनी काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमतानी विजयी करून लातूर शहर महानगरपालिकेत पाठवून परत लातूरचा चौफेर विकास केला पाहिजे, असे प्रतिपादान विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर शहर महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाणे शहरातील प्रभाग क्र. ८ चे काँग्रेस-वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार पतंगे अभिषेक राजेंद्र, घंटे रेहानाबेगम ताहेरअली, झिपरे श्रावणी बालाजी, उटगे स्नेहल श्रीकांत, तसेच प्रभाग क्र. ६ चे अधिकृत उमेदवार दिनेश सुरेश गोजमगुंडे, सुनिता नामदेव चाळक, मंजुळा जयप्रकाश अग्रवाल, गिरीश गुरुनाथ आप्पा ब्याळे यांच्या प्रचारार्थ आयोजीत महिला संवाद बैठकीत विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख बोलत होत्या. यावेळी तनुजा कांबळे, जयश्रीताई पाटील, जगदीश बावने, अशोक गोविंदपुरकर, सूर्यकांत बसवंतआप्पा बर्डे, बालाप्रसाद बिदाद, चंद्रकांत पाटील, रमेश सूर्यवंशी, गुणवंत वाघमारे, सिकंदर पटेल, संपत हनुमंत पटेल, जयप्रकाश अग्रवाल, तुषार अग्रवाल आदी उपस्थित होते.
काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि आमदार अमित देशमुख लातूरच्या विकासासाठी आवश्यक निधी आणतील. त्या माध्यमातून लातूर शहराचा चौफेर विकास आपल्याला करता येणार आहे. काँग्रेस पक्ष हा सर्व गोर-गरीब, शेतकरी यांना सोबत घेवून चालणारा पक्ष आहे, असे नमूद करून श्रीमती वैशालीताई विलासराव देशमूख म्हणाल्या, भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात अनेक आश्वासने दिली आहेत. मात्र त्यांनी ना काळा पैसा परत आणला, ना प्रत्येकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये टाकले. युवक, युवतींना वर्षातून २ कोटी नोक-या देण्याचे आश्वासन दिले. मात्र, युवक, युवतींना नोक-या दिल्या नाहीत. त्यामुळे या सरकारच्या जाहिरातीला बळी पडू नका. कॉग्रेस पक्षाने आपल्या लातूर शहराचा विकास केला आहे.
त्यासाठी येण्या-या गुरूवारी सर्व मतदारानी काँग्रेसचे-वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवाराला मतदान रूपी आशिर्वाद देवून विजयी करावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले. याप्रसंगी अॅड. जयश्री पाटील, तनुजा कांबळे, मीना सुर्यवंशी, प्रज्ञा उटगे, स्नेहा उटगे, नेहा पंतगे, वनमाला उटगे, जया गिल्ले, अश्विनी शेट्टे, राजश्री सोळसे, प्राजक्ता चौफुले, वैभवी उटगे, राधा उटगे, तनुजा उगीले, शामल उटगे, भारती पतंगे, जया झिपरे, इशाका उटगे, पुष्पा बिराजदार, ललीता उटगे, सुनिता बिमपोरे, स्वर्णा घाळे,जया पाटील, उषा ब्याळे, ज्योती ब्याळे, अनुजा पाटील, हेमलता पवार, अनिता पाटील, गायत्री ब्याळे, खाजाभानू अन्सारी, अर्चना पहिलेवाड, रेणुका शेंद्रे, सुवर्णा साधले, अर्चना ईरले, सुमन वैद्य, नूरजा पठाण, नशिफा शेख, शकुंतला थोरात, मैना टेकाळे, ज्योती टेकाळे, शांता देवनुरे, कमल तिवारी, अनुसया वाघलगावे, कल्पना निटुरे, सुरेखा हंणरगे, सीमा लोंढे, कमल दिवणुरे, राह्याबाई तुरसुरे, मीरा घंटे, वायदा शेख, सुरेखा गंगणे, सुनीता साबणे, गोदावरी टोम्पे, राधिका गंगणे यांच्यासह आदी महिला उपस्थित होत्या.

