पुणे : प्रतिनिधी
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घटल्याने काही भाज्यांचे दर वाढले. विशेषत: भेंडी, गवार, काकडी, वांगी, गाजर, घेवडा आणि भुईमूग शेंग यांच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली, तर मटारचे दर घसरले. हिरवी मिरची मात्र स्वस्त झाली असून, इतर भाज्यांचे दर तुलनेने स्थिर राहिले.
सोमवारी (दि. १०) गुलटेकडी मार्केट्याडांत राज्य व परराज्यांतून सुमारे ८५ ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, उत्तरप्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून हिरवी मिरची, कोबी, शेवगा, घेवडा आणि भुईमूग शेंग यांचा समावेश होता. इंदोर, राजस्थान आणि जयपूर येथून गाजर, मध्यप्रदेश व हिमाचल प्रदेशातून मटार, तर तामिळनाडूहून तोतापुरी कैरी आली. स्थानिक भागांतून भेंडी, गवार, टोमॅटो, ढोबळी मिरची, आले, गाजर उप्लब्ध आहेत.
पालेभाज्यांच्या भावात झाली वाढ
आवक घटल्याने पालेभाज्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी मार्केटयार्डात कोथिंबीर सुमारे १ लाख जुडी, तर मेथी ५० हजार जुडी आली. मागणी वाढल्यामुळे भावांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता सामान्यांच्या खिशाला अजून त्रास होणार आहे हे मात्र नक्की.

