लातूर : भादा व औसा परिसरात भूगर्भातून आवाज आल्याची माहिती दि. २० मार्च रोजी स्थानिक प्रशासनास प्राप्त झाली होती. सदर घटनेची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत तात्काळ ठं३्रङ्मल्लं’ उील्ल३ी१ह्याङ्म१ री्र२ेङ्म’ङ्मॅ८ (ठउर), नवी दिल्ली यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली. त्यांच्या तपासणीनुसार भादा-औसा परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे सदरील घटना भूगर्भातील नैसर्गिक हालचालींमुळे निर्माण होणा-या आवाजाचा प्रकार असण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये व प्रशासनाकडून देण्यात येणा-या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

