23.6 C
Latur
Monday, July 14, 2025
Homeमुख्य बातम्याभारताच्या हाती लवकरच हायटेक मिसाईल!

भारताच्या हाती लवकरच हायटेक मिसाईल!

डीआरडीओ । चीन, पाकिस्तानचे वाढणार टेन्शन; हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकलची चाचणी अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताची प्रमुख संरक्षण संशोधन संस्था ‘डीआरडीओ’ सातत्याने देशाच्या लष्करी सामर्थ्याला नवीन उंचीवर नेण्यासाठी आधुनिक आणि प्रगत शस्त्र प्रणालींवर सतत काम करत आहे. यामध्ये हायपरसोनिक मिसाईल, हायएनर्जी लेजर, स्टेल्थ लढाऊ विमाने, ड्रोनविरोधी तंत्रज्ञान आणि हवाई संरक्षण प्रणालींचा समावेश आहे. भारत पुढील पिढीतील अत्याधुनिक शस्त्रे विकसित करण्याच्या दिशेने वेगाने कशी वाटचाल करत आहे याबाबत डीआरडीओचे प्रमुख डॉ. समीर व्ही. कामत यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले.

सर्वात पहिली चर्चा होते की ब्रह्मोस-एनजी क्रूज मिसाईल, जी सध्या अस्तित्वात असलेल्या ब्रह्मोसपेक्षा हलकी आणि छोटी असेल. विविध प्रकारच्या लढाऊ विमानांना ती सहजपणे लावता येईल. सध्या जी ब्रह्मोस आहे ती केवळ रव 30टङक सारख्या लढाऊ विमानालाच फिट होऊ शकते. ऊफऊड ब्रह्मोसमध्ये अपग्रेड करत त्याची रेंज वाढवून वजन कमी करण्यावर काम करत आहे जेणेकरून भारतीय हवाई दल आधुनिक रणनीतीने काम करू शकेल.

याशिवाय दोन हायपरसोनिक मिसाईल सिस्टमवरही काम सुरू आहे. यापैकी एक हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल आहे जी त्याच्या चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात आहे आणि पुढील दोन ते तीन वर्षांत ती सैन्यात समाविष्ट केली जाऊ शकते. दुसरीकडे, स्क्रॅमजेट इंजिन तंत्रज्ञानात एक मोठी प्रगती झाली आहे, जी १००० सेकंद चालते. त्यातून हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र बनवण्याची तयारी सुरू आहे, ज्याला सरकारने मान्यता दिल्यास ५-७ वर्षांत तयार होऊ शकते.

एअर-टू-एअर मिसाइल
हवाई युद्ध क्षमता बळकट करण्यासाठी डीआरडीओ हवेतून हवेत मारा करणारी अस्त्र एमके-२ आणि एमके-३ क्षेपणास्त्रांवर काम करत आहे. त्याच वेळी रुद्रम-२, रुद्रम-३ आणि रुद्रम-४ ही जमिनीवरून मारा करणारी क्षेपणास्त्रे भारतीय सशस्त्र दलांना आणखी बळकटी देतील. ड्रोनसारख्या धोक्यांना तोंड देण्यासाठी ‘डीआरडीओ’ एका डायरेक्टेड एनर्जी वेपन सिस्टमवरही काम करत आहे, ज्यामध्ये लेजर आणि हायपॉवर माइक्रोव्हेव तंत्रज्ञान समाविष्ट असेल. भारताचे एअर डिफेन्स नेटवर्क मजबूत करण्यासाठी ‘कुशा’ नावाच्या लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणा-या मिसाईल प्रणालीचा विकास देखील वेगाने सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR