26.7 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeराष्ट्रीयभारतातील महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ

भारतातील महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ

नवी दिल्ली : प्रतिनिधी
महिला कैद्यांच्या वाढत्या संख्येने आता चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर क्राइम अँड जस्टिस पॉलिसी रिसर्च’च्या ताज्या ‘वर्ल्ड फिमेल इम्प्रिझनमेंट लिस्ट’ अहवालानुसार, दोन दशकांत भारतीय तुरुंगांत महिलांच्या संख्येत वाढ होण्याचा वेग पुरुषांच्या, सामान्य लोकसंख्या वाढीपेक्षा दुप्पट आहे. महिला कैद्यांच्या संख्येत भारत जगात सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याआधी अमेरिका, चीन, ब्राझील, रशिया व थायलंडचा समावेश होतो.

अहवालातील आकडेवारीनुसार, २००० ते २०२२ दरम्यानची भारतीय तुरुंगांमधील महिला कैद्यांची (न्यायाधीन आणि शिक्षा झालेले दोन्ही) स्थिती खालीलप्रमाणे आहे.
महिला कैद्यांची वाढ : २००० साली ही संख्या ९,०८९ होती, जी २०२२ पर्यंत २३,७७२ वर पोहोचली आहे (अंदाजे १६२% वाढ).
पुरुष कैद्यांची वाढ : याच काळात पुरुष कैद्यांची संख्या ३,१०,३१० वरून ५,४९,३५१ झाली आहे (एकूण ७७% वाढ).
लोकसंख्या वाढ : या काळात भारताची एकूण लोकसंख्या अंदाजे ३०% नी वाढली आहे. महिला कैद्यांच्या तुलनेत वाढ कमीच.

महिला कैद्यांची संख्या
अमेरिका १,७४,६०७
चीन १,४५,०००
ब्राझील ५०,४४१
भारत २३,७७२

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR