23.1 C
Latur
Friday, October 11, 2024
Homeमुख्य बातम्याभारतातील ९० टक्के लोकांना स्थान राहिले नाही : राहुल गांधी

भारतातील ९० टक्के लोकांना स्थान राहिले नाही : राहुल गांधी

असंध : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी आज हरियाणातील असंध येथे एका प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाना साधत, शेतकरी, तरुण आणि जातनिहाय जनगणना आदी मुद्यांवर भाष्य केले. तसेच, हरियाणातील तरुण अमेरिकेत का जात आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

जातनिहाय जनगणनेसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, इलेक्शन कमीशनमध्ये भाजपचे लोक, ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांमध्ये भाजपचे लोक, आपल्याला येथे गरीब आणि दुस-या जातीची लोकं सापडणार नाहीत. यामुळे आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहोत.

राहुल गांधी म्हणाले, भाजपवाले संविधानावर हल्ला करत आहेत. भारतात कुणाची संख्या किती आहे? ते आम्ही तपासायला सांगत आहोत. आरएसएस जातनिहाय जनगणना करायला सांगतो, पण आतून नकार देतो. गरीब मागास आपल्याला मोठ्या पदावर दिसणार नाही.

राहुल गांधी पुढे म्हणाले, ही लढाई हरियाणा नव्हे, तर भारताला वाचविण्याची आहे. देशातील सर्व संस्था आरएसएसच्या हवाली करून दिल्या आहेत. ज्यांवर नागपूरचा कंट्रोल आहे. त्यांत भारतातील ९० टक्के लोकांसाठी कुठलेही स्थान नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR