Homeअंतरराष्ट्रीयभारतासमोर आता इंधन संकट वाढण्याचा धोका?

भारतासमोर आता इंधन संकट वाढण्याचा धोका?

इराण देणार धक्का!, मंडेब सामुद्रध्वनी बंद?
तेहरान : वृत्तसंस्था
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज युद्धाचा १६ वा दिवस होता. मध्य पूर्वेत प्रचंड तणाव आहे. या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूझ स्ट्रेट बंद केला. यामुळे संपूर्ण जग मोठ्या इंधन संकटात सापडले आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील २५ टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या सामुद्रधुनीमधून होते. दरम्यान, आता यमनच्या हुती बंडखोरांनी इराणच्या समर्थनार्थ बाब अल-मंडेब सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा दिला आहे. तसे झाल्यास भारताचे इंधन संकट अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बाब अल-मंडेब सामुद्रधुनी कोणत्याही वेळी हुती बंडखोरांकडून बंद करण्यात येऊ शकते. एका हुती बंडखोरांच्या वरिष्ठ कमांडरने जर अमेरिका आणि इस्त्रायकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांविरोधात आम्ही इराणची मदत करण्याचा निर्णय घेतला तर बाब अल-मंडेब स्ट्रेट बंद करणे हा मुख्य पर्याय असणार आहे, असे म्हटले. बाब अल-मंडेब स्ट्रेट बंद केला तर भारताची तेल समस्या गंभीर बनू शकते. कारण भारत या दोन मार्गांनी मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि गॅसची आयात करतो. अशा स्थितीत हे दोन्ही रस्ते बंद झाल्यास भारतासमोर इंधन तुटवड्याचे मोठं संकट निर्माण होऊ शकते.

…तर ऊर्जा संकट गंभीर
युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ स्ट्रेट तर आधीपासूनच बंद आहे. त्यामुळे भारतात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. आता जर हुती बंडखोरांनी बाब अल-मंडेब सामुद्रधुनी बंद केली तर भारतासमोर असलेले ऊर्जा संकट दुप्पट होण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रचंड वाढू शकतात. गॅसचाही तुटवडा निर्माण होऊ शकतो.

१२ टक्के आयात,
निर्यात या मार्गाद्वारे
जगातील एकूण व्यापारापैकी जवळपास १२ टक्के आयात, निर्यात या मार्गाने होते. त्यामुळे हा मार्ग केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा आहे. जर हा मार्ग हुती बंडखोरांनी बंद केला तर संपूर्ण जगच मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान इराणच्या एका इशा-यावर आता हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR