26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeअंतरराष्ट्रीयभारत जर्मनीकडून घेणार ६ अत्याधुनिक पाणबुड्या

भारत जर्मनीकडून घेणार ६ अत्याधुनिक पाणबुड्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने संरक्षण सज्जतेवर आणखी भर देण्याचे ठरवले आहे. यास्तव केंद्र सरकारने नौदल आणि हवाई दलाची प्रहार क्षमता वाढवण्यासाठी ७० हजार कोटी रुपये मोजून जर्मनीकडून सहा अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, सोबतच हवाई दलासाठी इस्रायलकडून रँपेज क्षेपणास्त्रे खरेदी करण्यालाही मान्यता देण्यात आली आहे.

भारतात बांधल्या जाणा-या या पाणबुड्यांच्या खरेदीसाठी वाटाघाटी सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. हा करार ७० हजार कोटी रुपयांचा आहे. संरक्षण मंत्रालयाने जर्मन कंपनी थायसेनक्रूप मरीन सिस्टीम्ससोबत सहा पाणबुड्या बांधण्यासाठी माझगाव डॉकयार्डची भागीदार म्हणून निवड केली आहे.

दुसरा करार म्हणजे इस्रायली रॅम्पेज हवेतून जमिनीवर मारा करणा-या क्षेपणास्त्रांचा मोठा साठा खरेदी करणे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानमधील मुरिदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी मुख्यालयांवर अचूक हल्ल्यांमध्ये या सुपरनॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आणि तो अत्यंत यशस्वी ठरला होता.

अचूक प्रहार करण्याची क्षमता
शत्रूचे लष्करी तळ, हवाई तळ, दारूगोळा कोठार, रडार केंद्र अचूकपणे नष्ट करू शकण्याची जबरदस्त क्षमता या क्षेपणास्त्रात असून ते एफ-१५, एफ-१६, एफ-३५ आणि भारताच्या सुखोई-३० एमकेआय यांसारख्या लढाऊ विमानांमधून सहज डागता येते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR