लखनौ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना आज लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार होता. मात्र चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरत हा सामना अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाऊस किंवा वादळ नसतानाही सामना रद्द व्हावा, ही बाब सगळ््यांंनाच चकित करणारी ठरली.
]लखनौमध्ये संध्याकाळपासूनच मैदानात धुक्याची चादर होती. याच कारणामुळे नियोजित वेळेत टॉस होऊ शकला नाही. सुरुवातीला पंचांनी सायंकाळी ६:५० वाजता मैदानाची पाहणी केली. त्यानंतर परिस्थितीत सुधारणा न झाल्याने टॉस पुढे ढकलण्यात आला. धुक्याची तीव्रता कायम राहिल्याने पंचांनी ७:३० वाजता पुन्हा निरीक्षण केले. मात्र, दृश्यता अत्यंत कमी असल्याने रात्री ८ वाजता पुन्हा एकदा मैदानाची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण धुक्यात कोणतीही लक्षणीय सुधारणा न झाल्याने अखेर सामना रद्द करण्यात आला.

