भिंवडीत ३ मुलींसह महिलेची आत्महत्या

भिवंडी : पती रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असताना घरी असलेल्या पत्नीने आपल्या तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना भिवंडी शहरातील फेणे गाव येथे घडली असून आज सकाळी पती कामावरून घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, फेणे गाव येथील एका चाळीत लालजी बनवारीलाल भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता (वय ३२) व मुली नंदिनी (वय १२),नेहा (वय ०७) व अनू (वय ०४) यांसोबत राहत होता. लालजी शुक्रवारी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता. आज सकाळी नऊच्या सुमारास तो घरी परतला असता घराचा दरवाजा आतून बंद होता. अनेक वेळा दरवाजा वाजवूनही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पती लालजी याने छोट्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

हतबल झालेल्या लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला असता आतमध्ये छताच्या लोखंडी अँगलवर पत्नीसह मुलींनी गळफास घेऊन आत्महत्या केलेले मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, महिला अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिलेली चिठ्ठी घटनास्थळी आढळून आली आहे.

दरम्यान, मुलींना गळफास लावून नंतर स्वत: जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय महिलेने कोणत्या कारणामुळे घेतला, याबाबतचा अधिक तपास स्थानिक पोलिसांकडून केला जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात परभणीत महामोर्चा #marathilivenews #breakingnews
00:34
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये FDA-एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; लाखोंचा गुटखा जप्त!
01:13
Video thumbnail
विधान परिषद निवडणुकीपूर्वी आष्टीकरांची सोशल मीडियावरून भूमिका स्पष्ट #marathilivenews #breakingnews
02:12
Video thumbnail
Latur|जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
02:18
Video thumbnail
Latur|RTO कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू
05:29
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषदेत मोठा सस्पेन्स; आष्टीकर ठरवणार गेम?
01:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये 'मृत्यूचा डीव्हायडर'; अपघाताची वाट पाहतेय प्रशासन?
02:18
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका; लातूरच्या खव्याच्या दुकानांवर FDA ची धाड
02:37
Video thumbnail
parbhani Protest|मसला येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
02:30
Video thumbnail
माढा तालुक्यातील दारफळ येथील नवभारत विद्यालयात 'प्रवेशोत्सव' व पाठ्यपुस्तक वितरण सोहळा संपन्न!
02:52
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24

Latest news