लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात यावर्षी पावसाळयात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. वरिष्ठ भूजल विभागाच्यावतीने सप्टेंबर अखेर भूजल पातळीची तपासणी केली आहे. या तपासणीत गेल्या पाच वर्षाच्या तलुनेत लातूर जिल्हयाच्या भूजल पातळीत २.०३ मिटरने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हयातील सर्व तालुक्यांच्या भूजल पातळीत वाढ झाली आहे.
लातूर जिल्हयातील १०९ जुन्या शिवकालीन विहिरींचे वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाच्या टिमकडून जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर महिण्यात भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात येते. त्यानुसार सप्टेंबर अखेर जिल्हयातील भूजल पातळीची तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी केली असता जिल्हयाच्या भूजल पातळीत गेल्या पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत २.०३ मिटरने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
जिल्ह्यात १ हजार मि. मी. पेक्षा अधिक पाऊस
लातूर जिल्हयात सरासरी ७९१.६० मिमी पाऊस पडतो. तो यावर्षी १०२५.४ मिमी पाऊस झाला आहे. यात लातूर तालुक्यात ९१०.१ मिमी, औसा तालुक्यात ९२१.२ मिमी, अहमदपूर तालुक्यात १२१४.२ मिमी, निलंगा तालुक्यात ९६४.३ मिमी, उदगीर तालुक्यात ११२२ मिमी, चाकूर तालुक्यात १०६२.७ मिमी, रेणापूर तालुक्यात ९८२.१ मिमी, देवणी तालुक्यात १०२० मिमी, शिरूर अनंतपाळ १२१४.४ मिमी, तर जळकोट तालुक्यात १०३९.४ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हयात रब्बी पिकांसाठी मुबलक पाणी साठा तयार झाला आहे. त्यामुळे जिल्हयात रब्बी पिकांसाठी मुबलक पाणी साठा तयार झाला आहे.

