भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ!; ईडीचे ३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

मुंबई : प्रतिनिधी
स्वत: देवाचा अवतार असल्याचा दावा करून भाविकांची फसवणूक करणा-या अशोक एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन भोंदू बाबा’च्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ईडीने त्याच्या विरोधात ४२.८८ कोटी रुपयांच्या कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयात तब्बल ३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरातसह आणखी चार जणांनाही आरोपी करण्यात आले आहे.

ईडीच्या तपासानुसार, अशोक खरातने अनेक वर्षे धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. ‘अवतार पूजा’ आणि विशेष धार्मिक विधींच्या माध्यमातून आजार, आर्थिक संकटे, कौटुंबिक समस्या तसेच भविष्यातील अडचणी दूर होतील, असे आश्वासन देऊन भक्तांकडून देणग्या आणि पूजा शुल्क घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेषत: व्यावसायिकांना आर्थिक नुकसान किंवा कुटुंबीयांच्या सुरक्षिततेबाबत भीती दाखवून मोठ्या रकमांची वसुली केल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.

तपासादरम्यान काही धक्कादायक बाबीही समोर आल्या आहेत. दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी रिमोट कंट्रोलद्वारे चालणारे बनावट साप, वाघाची कातडी यांसारख्या वस्तूंचा वापर करण्यात येत असल्याचे ईडीने म्हटले आहे. तसेच महिला भक्तांना संशयित गुंगीचे औषध देणे आणि चिंचेच्या बिया, दगड तसेच मध यांना चमत्कारिक उपचार असल्याचे सांगून त्यांची विक्री केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मनी लॉन्डरिंगसाठी विविध सहकारी पतसंस्था आणि बेनामी खात्यांचा वापर करण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे. राहाता येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेत १०८ तर सिन्नर येथील जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ३४ बेनामी खाती उघडण्यात आल्याचे तपासात आढळल्याचे सांगितले आहे. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करून ती रक्कम नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर आणि मुंबईतील मालमत्ता खरेदीसाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे.

ईडीने केलेल्या छाप्यांमध्ये १३.९२ कोटी रुपयांची रोकड, ५.१८लाखांचे विदेशी चलन, १.१२ कोटी रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, २.६० कोटी रुपयांच्या बँक ठेवी तसेच एक मर्सिडीज-बेंझ कार जप्त केली आहे. एकूण १७.७०कोटी रुपयांची मालमत्ता जप्त किंवा गोठवण्यात आली असून, याशिवाय १९.२० कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ताही तात्पुरत्या जप्त करण्यात आल्या आहेत. या आरोपपत्रासोबत ईडीने ३७ साक्षीदारांचे जबाब, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि जप्तीशी संबंधित दस्तऐवज न्यायालयात सादर केले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून विशेष पीएमएलए न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news