23.8 C
Latur
Wednesday, March 11, 2026
Homeमहाराष्ट्रमंत्री शिरसाट यांच्या बंगल्यात घुसणारा गंभीर गुन्ह्यातील आरोपी

मंत्री शिरसाट यांच्या बंगल्यात घुसणारा गंभीर गुन्ह्यातील आरोपी

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
रविवारी रात्री कार्यक्रम आटोपून घरी आलो तेव्हा अचानक वीज गेली आणि तेवढ्यात एक तरुण घरात घुसला. तो गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याला कोणी सुपारी दिली का, असा संशय असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले, आधी मला ही किरकोळ घटना वाटली. पण, प्रकरण गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. सौरभ अनिल भोले असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खुनाचा आणि बनावट नोटा प्रकरणांत गुन्हा नोंद आहे. रात्री ११ वाजता असे येणे म्हणजे त्याचा काही तरी हेतू आहे. तो पोलिसांना धमकी देत होता.

जोपर्यंत सत्यता समोर येणार नाही, तोपर्यंत मी कुणाचेही नाव घेणार नाही. मला अतिरिक्त सुरक्षेची गरज नाही. ज्या वेळेस मी घरी आलो, त्याच वेळेस वीज गेली आणि घरातील सीसीटीव्ही बंद झाले. काही सेकंदात जनरेटर सुरू झाले, तेवढ्यात हे सर्व झाले. सीसीटीव्ही पुन्हा सुरू होण्यासाठी दोन ते तीन मिनिटे लागतात. राजकारणात असे प्रकार घडतात. आता यापुढे सावध राहणार असल्याचे शिरसाट म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR