23.6 C
Latur
Wednesday, June 18, 2025
Homeमहाराष्ट्रमतदान केंद्रावर उमेदवाराच्या स्लिप

मतदान केंद्रावर उमेदवाराच्या स्लिप

श्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदानावेळी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे महायुतीच्या उमेदवारांच्या स्लिप मतदान केंद्रात मिळून आल्या. त्यास विरोधी महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आक्षेप घेत निवडणूक कर्मचा-यांवर संताप व्यक्त केल्याचा व्हिडिओ समोर आला.

त्यामुळे मतदान केंद्रावर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. शिर्डीत महायुतीचे सदाशिव लोखंडे, महाआघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे व वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्यात लढत होत आहे. सोमवारी सकाळपासूनच तीनही उमेदवार मतदारसंघातील केंद्रांना भेट देत होते.

दुपारी एक वाजेच्या दरम्यान भाऊसाहेब वाकचौरे हे पोहेगाव येथील मतदान केंद्रावर समर्थकांसह दाखल झाले. त्यावेळी प्रत्यक्ष मतदान केंद्रात महायुतीचे लोखंडे यांच्या नावाच्या स्लिपचे वितरण केले जात होते, असे वाकचौरे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR