24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रमतदारांना वाटल्या चांदीच्या वाट्या

मतदारांना वाटल्या चांदीच्या वाट्या

पुण्यात वसंत मोरे आक्रमक

पुणे : अजित पवार आणि भाजप यांच्यातील तीव्र संघर्षामुळे कमालीच्या रंगतदार झालेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटण्याचे प्रकार सर्रास घडतात. हे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणि पोलिस डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत. मात्र, एवढा चोख बंदोबस्त असतानाही पुण्यात मतदारांना चांदीच्या वाट्या वाटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी हा आरोप केला आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ४० ड मधून निवडणुकीच्या रिंगणात आहे.

पुण्यातील कात्रज परिसरातील प्रभाग क्रमांक ४० मध्ये मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार वसंत मोरे आणि त्यांच्या मुलाने केला आहे. बुधवारी संध्याकाळी एका गाडीतून मोठ्या प्रमाणात चांदीच्या वाट्या प्रभागात नेल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या प्रकरणी संबंधित गाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश कदम यांच्या प्रचाराच्या पत्रिका तसेच मतदारांची यादी आढळून आल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. त्यामुळे सदर गाडी ही प्रचारासाठीच प्रभागात आली होती, असा त्यांचा दावा आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत वसंत मोरे यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR