27.1 C
Latur
Monday, December 8, 2025
Homeलातूरमतदार यादीतील गोंधळावर  लातूर काँग्रेसचा गंभीर आक्षेप

मतदार यादीतील गोंधळावर  लातूर काँग्रेसचा गंभीर आक्षेप

लातूर : प्रतिनिधी
आगामी लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून या मतदार यादीमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन  लातुर मनपा आयुक्तांना सादर करीत तातडीने या त्रुटी दूर केल्या जाव्यात, अशी मागणी लातुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केली गेली आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक विभागाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकाची तयारी सुरु केली गेली आहे. या अंतर्गत आगामी काळात लातुर महानगरपालिका निवडणूक पार पडणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातुर शहर महानगरपालिकेकडुन प्रारूप मतदार याद्या नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र लातुर महानगरपालिका निवडणूकिसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आसल्याचा आक्षेप लातुर शहर काँग्रेस कमिटीकडून घेण्यात आला आहे. यामध्ये लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुक अनुषंगाने दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. मात्र ही यादी प्रभागांनुसार आणि भौगोलिक रचनेनुसार पूर्णपणे सदोष व चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या चुकीमुळे सामान्य नागरिक त्रस्त
ज्यामुळे मनपा कर्मचा-यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून “प्रारूप यादी बनवताना कार्यालयाकडून अक्षम्य चुका झालेल्या आहेत,कार्यालयाच्या या चुकीमुळे अनेक मतदारांची नावे ते रहिवास करीत असलेला  प्रभागाऐवजी इतर प्रभागात नोंदवली गेली आहेत परिणामी मारदारांना यामुळे त्रास सोसावा लागत आहे. त्यांना फॉर्म भरून दुरुस्ती करावी लागत आहे कर्मचारी वर्गा कडून झालेल्या चुका साठी मतदाराना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्या मूळ प्रत्यक्ष सीमा तपासून,  रहिवासाची खात्री करून प्रभागाची मतदार यादी तयार करावी . याबाबत लातुर काँग्रेस कमिटीकडून कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे दि.०३ डिसेंबर (बुधवार) रोजी लेखी निवेदन देऊन तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच लातुर मनपा कडून प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये अक्षम्य चुका झाल्या असून त्या दुरूस्त करण्याऐवजी मतदारांनीच कार्यालयातून  त्यांचे दुरुस्ती करण्याबाबतचे फॉर्म न्यावेत व ते मतदारांनीच भरून द्यावेत असे सांगण्यात येत आहे.लातुर मनपाकडून झालेल्या चुकीसाठी शहरातील मतदारांना वेठीस धरण्याचे काम लातुर मनपा करीत आहे आणि हे अत्यंत चुकीचे आहे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या सर्व बाबींचा विचार लातुर मनपाने तातडीने करावा व प्रारूप मतदार यादीत झालेल्या चुका,त्रुटींची दुरुस्ती करावी आणि लातुर शहरातील मारदारांना होत असलेली गैरसोय दूर करून दिलासा द्यावा अशी मागणी लातुर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी लातुर मानपा आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातुन केली आहे.
यावेळी लातुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपुरकर, माजी उपमहापौर कैलास कांबळे, इम्रान सय्यद, गोरोबा लोखंडे, सुरज राजे, प्रवीण सूर्यवंशी, यशपाल कांबळे, आसिफ बागवान, प्रा. सिद्राम कटारे, गिरीश ब्याळे, तब्रेज तांबोळी, धोंडीराम यादव, आतिक बासले, बालाजी गवळी, विजय गायकवाड, जी. ए. गायकवाड, राजकुमार कत्ते यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR