16.9 C
Latur
Sunday, November 9, 2025
Homeमहाराष्ट्रमतदार याद्यांतील हरकती नोंदवा : सतेज पाटील

मतदार याद्यांतील हरकती नोंदवा : सतेज पाटील

पुणे : प्रतिनिधी

राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका होत आहेत. निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असून काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिका-यांनी विषयवार कामाची जबाबदारी घेतली पाहिजे. प्रभाग रचना, गट व गण तसेच मतदार याद्यांचा अभ्यास करा व काही हरकती असतील तर त्या नोंदवल्या पाहिजेत, असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले.

खडकवासला येथे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेत पाटील बोलत होते. ते म्हणाले, आपल्या भागातील जनतेचे प्रश्न हाती घेऊन आंदोलने केली पाहिजेत. आठवड्यातून एक तरी आंदोलन झाले पाहिजे.१८ ते २५ वयोगटातील तरुण नवमतदार काँग्रेससोबत जोडला गेला पाहिजे त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा, आगामी काळात महाराष्ट्र काँग्रेसमय झाला पाहिजे असा संकल्प करा व त्यादृष्टीने वाटचाल करा असे आवाहनही केले.

काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांनी ‘सामाजिक न्याय व जनगणना’ या विषयावर आणि ‘सांस्कृतिक राजकारण’ या विषयावर शाहीर संभाजी भगत यांनी तर निवृत्त प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांनी ‘प्रशासन व कार्यकर्ता’ या विषयावर मार्गदर्शन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR