15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeलातूरमध्य प्रदेशातील १६ भाविकांचे साहित्य लंपास

मध्य प्रदेशातील १६ भाविकांचे साहित्य लंपास

औसा :  प्रतिनिधी
मध्यप्रदेशमधील सोळा भाविक श्रावण मासानिमित्त परळी वैजनाथ येथील ज्योतर्लिगिं दर्शनासाठी जात असताना औसा तालुक्यातील उजनी येथील एका पेट्रोलपंपावर अज्ञात चोरट्यांनी त्यांचे साहित्य लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि ५) पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
औसा -तुळजापूर मार्गावर काही दिवसांपूर्वीच वांगजीपाटी येथील एका बिअर बारमधून लाखो रुपयांची विदेशी दारू चोरल्याची घटना व दोन दिवसांपूर्वी याच महामार्गावरील शिवलीमोड ते शिंदाळा दरम्यान चोरीच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मंगळवारी मध्यप्रदेश राज्यातील हंक्कमसिंग चौहान, धर्मेद्र प्रजापती, आकाश भार्गव, आयुश चौहान, मोहनसिंग विश्वकर्मा, कोमलसिंग विश्वकर्मा, पुजा चौहान, नमिता धाकड, निशा धाकड, हिराबाई चौहान, ममताबाई रामेतीबाई, कुवरबाई धाकड, कमलाबाई विश्वकर्मा, श्रीबाई धाकड, ससी धाकड हे भाविक श्रावण महिन्यानिमित्ताने राज्यातील तुळजापूर येथील देवीचे दर्शन घेऊन ज्योतर्लिगिंचे दर्शन घेण्यासाठी परळी वैजनाथच्या दिशेने जात होते.
 उजनी येथील एका पेट्रोलपंपावर ते झोपले असताना त्यांच्याजवळील ३ मोबाईल, एटीएम, १५ ते २० हजार रुपये व नवीन खरेदी केलेल्या कपड्यासह गाडीच्या स्टँडवर बांधून ठेवलेल्या लगेज बॅग पळवल्याची घटना घडली. वारंवार घडणा-या घटनेमुळे पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पोलिसांना सतर्क राहून रात्री पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिल्या असताना दुसरीकडे चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येते आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR