लातूर : लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाने काम सुरु केले आहे. आतापर्यंत प्रभाग रचना जाहीर झाली आहे. प्रभाग आरक्षण सोडतीचे काम सुरु आहे. आता मदारयादीचा कार्यक्रम सुरु आहे. आतापर्यंत प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्यात आली आहे. ती प्रारुप मतदारयादी गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येऊन ती आक्षेपांसाठी खुली करण्यात येणार आहे.
अद्याप आचारसंहिता जाहीर झाली नसली तरी मतदारयादी कार्यक्रम, प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण, अशी कामे सुरु आहेत. आतापर्यंत प्रभाग रचना जाहीर झाली. अंतिम प्रभाग रचना २ डिसेंबर रोजी राजपत्रित झाल्यानंतर ती ग्रा मानली जाणार आहे. मनपाची निवडणुक २६ जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याचे शपथपत्र राज्य निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिल्याने त्या दृष्टीने काम सुरु आहे.

