Homeलातूरमनरेगा कामांचे १ कोटीचे कुशल मजुरी बिल थकित

मनरेगा कामांचे १ कोटीचे कुशल मजुरी बिल थकित

शिरुर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मंजूर सिंचन विहीर कामांचे तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांचे कुशल मजुरी बिल थकीत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तालुक्यातील सुमारे ६५ शेतक-यांनी विहिरींची कामे पूर्ण करूनही अद्याप मजुरीचे बिल मिळाले नसल्याने त्यांना पंचायत समिती कार्यालयाच्या वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.

संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही बिल मंजुरीचा प्रश्न प्रलंबित असल्याची शेतक-यांची तक्रार आहे. शेतक-यांनी सांगितले की, सिंचन विहिरींच्या कामासाठी मजूर, साहित्य व इतर खर्च स्वत:च्या खिशातून करावा लागला मात्र काम पूर्ण होऊनही शासनाकडून रक्कम न मिळाल्याने कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत पंचायत समिती प्रशासनाने तातडीने पाठपुरावा करून थकीत बिलांची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR