25.1 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeमहाराष्ट्रमनसेसोबत मविआची युती होणार?

मनसेसोबत मविआची युती होणार?

शरद पवारांनी आज बोलावली बैठक, चर्चेतून रणनिती ठरणार
मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची रविवारी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणुकीची रणनीती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत संभाव्य युती करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संदर्भात पवार यांनी उद्या महाविकास आघाडीची बैठक आहे, बैठकीत साधारणत: सगळ््यांसोबत बसून ही निर्णय घेऊ. राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांनी भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षांसोबत आघाडी करण्यास स्थानिक नेत्यांना मोकळीक दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीच्या शक्यतेने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोल्हापूरसह धाराशिव,
धुळ््यात मविआ एकत्र
कोल्हापूरसह धाराशिव, धुळ््यात महाविकास आघाडीने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या विरोधात आम्ही एकत्रित लढून महायुतीचा पराभव करू, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.कोल्हापुरातही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने एकत्रित लढण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला.

धाराशिवमध्ये महायुतीचे
आता एकला चलो रे?
शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी आजपासून दोन दिवस नगरपरिषद निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आपला दौरा सुरू केला. भूम येथील मेळाव्यात त्यांनी दंड थोपटत एकला चलो रेचा नारा दिला. आगामी निवडणुकीत सर्वधर्मसमभाव आणि विकास हाच आपला अजेंडा असेल, असे म्हटले. त्यामुळे महायुतीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR