31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेंना गोळ्या घालणार; धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

मनोज जरांगेंना गोळ्या घालणार; धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

बीड : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची भाषा केल्याची एक ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाली आहे. कराड समर्थकाकडून ही मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे कॉलवर बोलताना समर्थकाने धनंजय मुंडे यांचेही नाव घेत धमकावल्याचे ऐकू येत आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याचे नाव घेण्यात आले आहे. सध्या ही कॉल रेकॉर्डिंग सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे. संबंधित कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती दुस-­या व्यक्तीला बोलत असताना थेट मनोज जरांगे यांना मी गोळ्या घालून जीवे मारणार असल्याचे बोलत आहे.

त्याचबरोबर पुन्हा धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड म्हणायचे नाही, नसता तुलाही जीवे मारतो अशी धमकी कराड समर्थकांनी दिली. ही कॉल रेकॉर्डिंग सध्या प्रचंड प्रमाणात सोशल माध्यमांवर व्हायरल झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR