मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री ममता कुलकर्णी मध्यंतरी सिनेसृष्टीपासून दूर गेली होती. त्यानंतर तिने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. तिने महाकुंभ वेळी किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद स्वीकारले होते. यावरून वादही निर्माण झाले होते. मात्र ९० च्या दशकातील गाजलेली ममता कुलकर्णी जवळपास २५ वर्षांनंतर कॅमे-यासमोर दिसली. मोठ्या ब्रेकनंतर एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये तिची उपस्थिती ही प्रेक्षकांसाठी एक धक्का होता.
आता २५ वर्षांनी ‘लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेन्मेंट सीझन ३’ या कुकिंग रिअॅलिटी शोच्या नवीन एपिसोडमधून ती टेलिव्हिजनवर परतत आहे. अलीकडेच ती शोच्या सेटवर सोनेरी रंगाचे काठ असलेल्या एका सुंदर लाल साडीत पोज देताना दिसली.
ममताने दोन दशकांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच टीव्हीवर येण्याबद्दल तिचा उत्साह व्यक्त केला. तसेच आयुष्य इतके गंभीर झाले आहे, की कधीकधी हसणे छान असते, असेही तिने सांगितले. ‘द लाफ्टर शेफ्स सीझन ३’ मध्ये अली गोनी, कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, जन्नत जुबैर, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल, एल्विश यादव, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे सुद्धा स्पर्धकांच्या भूमिकेत आहेत. या शोचे सूत्रसंचालन भारती सिंग करत असून शेफ हरपाल सिंग सोखी हे शोचे परीक्षक आहेत.
तर अलीकडेच अंकिता लोखंडे, विकी जैन, अर्जुन बिजलानी, निया शर्मा आणि सुदेश लहिरी यांसारखे काही प्रेक्षकांचे आवडते जुने स्पर्धक परतले आहेत. ममता कुलकर्णी ९० च्या दशकात ‘करण अर्जुन’ आणि ‘सबसे बड़ा खिलाड़ी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र यशाच्या शिखरावर असतानाच ती अचानक चित्रपटसृष्टीतून दूर गेली. गेल्या काही वर्षांत तिने अध्यात्माची वाट निवडली होती. बराच काळ भारताबाहेर वास्तव्य केल्यानंतर आता तिची ही टीव्हीवरील पुनरागमनाची एन्ट्री चर्चेचा विषय ठरली आहे.

