जालना : प्रतिनिधी
परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जालना शहरातील नागरिकांनी पाणी वायाला घालवल्यास आता ५ हजारापासून पासून तर २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे आणि तसे आदेशही महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी काढले. घरगुती नळ जोडणी तोट्या आणि अंतर्गत जलवाहिनीला गळती असल्यास १५ ऑक्टोबर पर्यंत दुरुस्त करून घेण्याच्या सूचना आयुक्तानी दिल्या आहेत.
महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून पाणी खेचण्यासाठी विद्युत मोटार लावणे, रस्त्यावर वाहन धुणे,घरासमोरील रस्ता धुऊन काढणे अशा प्रकारचा पाण्याचा अपव्यय आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्याचा इशाराही दिला आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
दुष्काळी पिकांचे पंचनामे करण्याला वेग
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील आन्वा महसूल मंडळात शेतक-यांच्या दुष्काळी पिकांचे पंचनामे करण्याला वेग आला असून तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या पथकाकडून शेतर्कयांच्या बांधावर जात संयुक्त वाहने करण्यात येत आहे,तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव, पारध यासह आसपासच्या गावांमध्ये पंचनामे देखील झाले असून आता आता महसूल विभागाकडून इतर ठिकाणचे पंचनामे करण्यातही वेग आल्याचे चित्र पाहायला मिळते, जिल्ह्यात मागील दीड ते दोन महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतक-यांची सोयाबीन कपाशी यासह इतर पिकं करपून गेल्याने दुष्काळ जाहीर झाल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे आधी देण्यात आले होते.
चारा संकटामुळे दूग्ध व्यवसाय धोक्यात
जनावराच्या चा-याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ओला चारा संपल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत गेली दोन महिन्यापासून या परिसरात पाऊस नसल्यामुळे शेतक-यांकडे दहा ते बारा दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे लवकरात लवकर सरकारने जनावरांना चारा देण्याची सोय करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
















