23.9 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeलातूरमराठी अर्थशास्त्र परिषदेसाठी नियोजन बैठक

मराठी अर्थशास्त्र परिषदेसाठी नियोजन बैठक

लातूर : प्रतिनिधी
दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे होणा-या ४७ व्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या आयोजनाकरिता पूर्व नियोजन बैठक पार पडली. यावेळी ४७ व्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अधिवेशन १२ ते १४ नोव्हेंबर, या कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले, अधिवेशनाच्या नियोजन बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य शिवाजी गायकवाड उपस्थित होते.
नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या या परिषदेच्या यशस्वीतेसाठी दयानंद संस्थेचे व्यवस्थापन मंडळ व दयानंद कला महाविद्यालय सर्वतोपरी कार्य करेल असे आश्वासन प्राचार्य डॉ. एस. पी गायकवाड यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे उपस्थित अध्यक्ष व कार्यकारी सदस्य यांना दिले. तसेच मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार वावरे परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाने कोणकोणते कार्य पार पाडावेत याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यवाहक डॉ. मारोती तेगमपुरे यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या संहितेप्रमाणे परिषद पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. विश्वस्त डॉ. विकास सुकाळे यांनी परिषदेच्या आयोजनासाठी अर्थशास्त्र विभागाने केलेल्या तयारीचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. कार्यकारिणी सदस्य डॉ. राजाराम पाटील, डॉ. संजय धोंडे, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. एन. एम. शिंदे, डॉ. विजय भोपाळे हे बैठकीसाठी उपस्थित होते.  या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार डॉ. बालाजी  घुटे यांनी मानले.  बैठकीसाठी डॉ. स्वप्नजा पाठक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR