मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये तगडी टक्कर; एकाच दिवशी रिलीज होणार ४ चित्रपट

मुंबई : प्रतिनिधी
जुलै महिन्यात पहिल्याच आठवड्यात मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. एकाच दिवशी म्हणजे ३ जुलै २०२६ ला (शुक्रवारी) २ मराठी आणि २ हिंदी चित्रपट रिलीज होत आहेत. कोणत्या चित्रपटाला अधिक गर्दी जमणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अल्फा : आलिया भट्ट आणि शर्वरी वाघचा अल्फा चित्रपट अ‍ॅक्शन, स्पाय, थ्रिलर आहे. ‘अल्फा’ हा यशराज फिल्म्सचा चित्रपट आहे. ‘अल्फा’ चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळणार आहेत. ‘अल्फा’ हा भारतातील पहिला महिलाप्रधान अ‍ॅक्शन चित्रपट आहे. चित्रपटात हृतिक रोशन एका दमदार कॅमिओमध्ये दिसणार आहे.

बेबी डू डाय डू
‘बेबी डू डाय डू’ हा क्राईम, अ‍ॅक्शन चित्रपट आहे. हा चित्रपट बेबी कर्मारकर नावाच्या एका सामान्य कर्णबधिर-मूक एनजीओ कार्यकर्तीची कथा आहे. जी गुप्तपणे मुंबईत एक निर्दयी सुपारी किलर म्हणून काम करते. चित्रपटात हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत झळकली आहे.

‘मर्दिनी’: हा चित्रपट एका आईवर आहे, जी आपल्या मुलीसाठी कोणतेही धाडस करू शकते. ‘ज्याला आई तारी, त्याला कोण मारी’ ही टॅगलाईन खूप प्रसिद्ध झाली. या चित्रपटात आईच्या भूमिकेत मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि मुलीच्या भूमिकेत बाल कलाकार मायरा वायकुळ झळकणार आहे.

आऊट ऑफ सिलॅबस : ‘आऊट ऑफ सिलॅबस : पुस्तकांच्या पलीकडे’ हा चित्रपट एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेची तयारी करणा-या तरुणांच्या संघर्षावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेता अजिंक्य राऊत, अभिनेत्री अद्वयी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

नागबंधम : द सीक्रेट ट्रेजर
‘नागबंधम : द सीक्रेट ट्रेजर’ हा साऊथ चित्रपट आहे. हा चित्रपट तेलुगू आणि हिंदीत डब होणार आहे. हा पौराणिक कथा आणि इतिहासावर आधारित एक भव्य अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपट आहे. ही कथा एका योद्ध्याभोवती फिरते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50
Video thumbnail
Latur|पाऊसानंतर आता गोगलगायींचा कहर; शेतकरी संकटात!
06:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सर्व इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट; मनपा ॲक्शन मोडवर
02:28
Video thumbnail
Kishor Jadhav Shivnikar Maharaj|पिस्तुल्या शिवणीकर महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
02:56
Video thumbnail
Solapur|सांगोल्यात १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; ३७ हजार लिटर दूध जागेवरच नष्ट
01:42
Video thumbnail
Latur|नागलगाव परिसरातील पाझर तलाव कोरडे, जनावरांवर पाणीटंचाईचे संकट
01:15
Video thumbnail
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातील विहंगम सोहळा, डोळे दिपवून टाकणारा व्हिडिओ
00:40
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16
Video thumbnail
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट पलटली, १५ जणांचा मृत्यू
00:39
Video thumbnail
NANDED|नांदेड अतिक्रमण कारवाईत गोंधळ; जेसीबीच्या धडकेत व्यक्ती जखमी, पोलिसांचा बळाचा वापर
02:10
Video thumbnail
Nanded|कोसळलेल्या पुलाची आमदार आनंद बोंढारकरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना खडे बोल
02:06
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06

Latest news