लातूर : प्रतिनिधी
सेन्ट्रल इंडियाची सुप्रसिद्ध मल्लिका फॅशन अॅण्ड लाइफस्टाइल एक्झीबिशन लातुर येथील दिवानजी मंगल कार्यालयामध्ये दि. १८ व १९ एप्रिलपर्यंत सुरु आहे. या प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन फॅशन डिझायनर वैशाली गिरी, रेसीन आर्टिस्ट तनिष्का मनिष बोरा, डॉ संध्या करड, सानिका ककनाटे, आकांशा नवदिंगे, प्रो. डॉ. क्रांती विठ्ठलराव मोर, गायत्री जोधवानी, अनुराधा बनसोड यांचे हस्ते पार पडले. येणा-या ग्राहकांनी प्रदर्शनीच्या आयोजकांचे कौतूकसुद्धा केले. या एक्झीबिशनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनीचा आज शेवटचा दिवस आहे. प्रदर्शनीमध्ये देशातील सुप्रसिद्ध डिजाइनर्सची उत्पादने ठेवण्यात आलेली आहेत.
या प्रदर्शनीमध्ये राखी व तीज कलेक्शन, अॅपारल, ज्वेलरी, फूटवेअर, फॅशन अॅसेसरीज व खुप काही उपलब्ध आहे. याक्ता लखनवी लखनऊ, कार्तिकी फॅशन, जळगाव, पुजा फॅशन, मुंबई, फाईन क्रियेशन लुधियाना, चार्मिंग क्रियेशन मुंबई, कबिर्स कोर्टयार्ड, एलिगेंट सारीज अॅण्ड ड्रेसेस, श्री ऑरोबिंदो इंटानॅशनल भंडारा, प्रिती डिझायनर, कुर्ती फॅशन हब, अहमदाबाद, नजाकत दिल्ली, आशपुरे फॅब्रिक्स मुंबई, इत्यादी सर्व एकाच छताखाली उपलब्ध आहे. अधिक माहीती करीसाठी ८६२५९४०६५५, ८३०८२२५१११ या क्रमांकांवर संपर्क करावा.

