‘मविआ’चा नकारात्मक प्रचार, महायुतीच्या पडला पथ्यावर!

लातूर : निवडणूक डेस्क
महाराष्ट्रात ख-या अर्थाने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना झाला. मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात जे घडलं ते लोकशाहीच्या दृष्टीने अजिबात चांगलं नव्हतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन मोठे पक्ष फुटले. आधी एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजपने युती सरकार बनवलं. नंतर अजित पवार सहभागी झाल्यानंतर ते महायुतीच सरकार बनलं. उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षांतर सुरु होते. कोण कुठल्या पक्षातून लढणार? हेच कळत नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणाची भेळ झाली होती. त्यामुळे मतदार राजाकडून एक स्पष्ट कौल हवा होता. आज तो कौल मिळाला.

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळेल इतक्याही जागा जिंकता आलेल्या नाहीत.

खरं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल चक्रावून टाकणारा आहे. भाजप, महायुती विरोधक निकालावर वेगवेगळ्या प्रकारे संशय व्यक्त करत आहेत. कारण सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने लोकसभेच्या ३१ जागा जिंकल्या होत्या. महायुतीला १७ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. सहसा सहा महिन्यात जनमत बदलत नाही. पण महाराष्ट्रात असं घडलं.

‘मविआ’ची मोठी चूक काय?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची अशी अवस्था होण्यामागे वेगवेगळी कारणं असली, तरी प्रमुख कारण आहे, नकारात्मक प्रचार. महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना, ज्येष्ठांसाठी, युवकांसाठी स्टायपेंड अशा वेगवेगळ्या योजना आणल्या. शेतक-यांना वीज बिल माफी दिली, त्याचा मतदारांवर परिणाम झाला हे खरं आहे. पण महायुतीचे सरकार हटवल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासासाठी काय प्लॅन आहे? पर्यायी योजना काय आहेत? हे मतदारांना पटवून देता आलेलं नव्हतं.

म्हणूनच महायुती जिंकली…
‘मविआ’ने फक्त महायुती सरकारवर टीका करण्यात जास्त शक्ती खर्च केली. या उलट महायुतीने ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’ असे मुद्दे प्रचारात आणले. पण महाराष्ट्राचा विकास कसा केला हे सुद्धा ते सांगत होते. महाविकास आघाडीला मात्र, महाराष्ट्राचा विकास कसा करणार? हे सांगता आलं नाही. जागा वाटपावरुन तसेच मुख्यमंत्री पदावरुन ‘मविआ’मध्ये मतभेद दिसून आले. महायुतीने मात्र लोकसभेतील पराभवातून धडा घेत चूका सुधारल्या. म्हणूनच महायुती जिंकली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03

Latest news