Homeलातूरमहमदापूर श्रीरामनगर येथे सत्यम रिसॉर्टचा शुभारंभ 

महमदापूर श्रीरामनगर येथे सत्यम रिसॉर्टचा शुभारंभ 

लातूर : प्रतिनिधी
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लातूर तालुक्यातील मौजे. महमदापूर पाटी येथे दि. १९ मार्च रोजी सत्यम रिसॉर्टचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, जागृती शुगर्सचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव काळे, रामकिशन रेड्डी उपस्थित होते.
याप्रसंगी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव,  लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अ‍ॅड. राजकुमार पाटील, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अ‍ॅड.  शेषेराव हाके, संचालक प्रकाश सुरवंशी, रेणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रविन पाटील, लातूर महापालिका स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले, नगर सेवक विकास कांबळे, दगडूसाहेब पडीले, संभाजीराव सुळ,  राजेसाहेब पाटील, शंकरराव पाटील, प्रा. डॉ. बालाजी वाघमारे, जनार्धनराव वीर, शंकरराव बोळंगे, रावसाहेब पाटील, दिलीप मुक्ता, ज्ञानोबा गवळे, रमाकांत वंगवाड, बालाजी सुरवसे, अरुण वीर, विष्णू वंगवाड, बंडु पाटील, अरुण विर, अंकुश शेळके,  शिवाजी रेड्डी, सुनिल रेड्डी, अक्षय रेड्डी, निखील रेड्डी व सरपंच, चेअरमन, सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन संभाजी रेड्डी यानी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR