अहमदपूर : प्रतिनिधी
महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इयत्ता बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९५.३५ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून १९१ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल १८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ९६.३३ टक्के लागला आहे. विशेष प्राविण्यासह०१, प्रथम श्रेणीत १३, तर द्वितीय श्रेणी १७० असे एकूण १८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून मालू प्रथमेश पवन याने-७६.१७ टक्के गुण घेउन प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. सर्व द्वितीय येण्याचा मान शिंदे संगम शिवानंद या विद्यार्थ्यांनी-६८.५० टक्के गुण घेऊन मिळविला आहे आणि गायकवाड सुजल विद्यासागर -६७.६७ मिळवून सर्व तृतीय आला आहे.
कला शाखेमधून ४६ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रवीष्ट झाले होते. त्यापैकी ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा सरासरी निकाल ९१.३० टक्के लागला आहे. कला शाखेत विशेष प्राविण्यासह २, प्रथम श्रेणीत ४ , तर द्वितीय श्रेणीत ३६ असे एकूण ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान आगलावे विद्या माधव हिने -७७.८३टक्के गुण घेऊन मिळविला आहे तर आगलावे अंजली हरिदास- हिने ७७.८३ टक्के गुण घेऊन सर्व द्वितीय आली असून घोडके मनीषा विष्णुकांत या विद्यार्थिनींनी-७१.१७ टक्के गुण घेऊन सर्व तृतीय आली आहे तर बोडके गौतम अंगद या विद्यार्थ्यांनी -७० टक्के गुण मिळवले आहेत.
एमसीव्हीसी विभागातून २० विद्यार्थी परीक्षेत प्रवीष्ट झाले होते त्यापैकी १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये विशेष प्राविण्यास उत्तीर्ण ०१, प्रथम श्रेणीत ०५ व द्वितीय श्रेणी मध्ये १० असे एकूण १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एम सी व्ही सी विभागातून- भाले मेघा संतोष -७७.१७ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे तर सर्व द्वितीय जाधव विशाखा श्रीधर- ६९ टक्के गुण घेऊन सर्व द्वितीय आली आहे. आणि शिंदे वैष्णवी नरसिंग हिने- ६६.६७ टक्के गुण घेऊन सर्व तृतीय आली आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव पांडुरंग तुकाराम शिंदे, उपाध्यक्ष माधवराव पाटील, प्राचार्य जाधव एस.आर., उपप्राचार्य बिरादार बी.व्ही., उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक चाकूरकर पी.बी,पर्यवेक्षक यादव टी.बी. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.
















