लातूर : प्रतिनिधी
येथील नांदेड रोडवरील महादेवनगर भागात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि. ४ नोव्हेंबर रोजी दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दत्त मंदिरात पहाटे दत्तमूर्ती अभिषेक करण्यात आला. सकाकी १० वाजता दत्तकृपा महिला भजनी मंडळाच्या वतीने दत्तमूर्ती व दत्तपादुकांची पालखीतून टाळ मृदंगाच्या वाद्यांच्या सुरात, फटाके उडवत महादेवनगर गरुड चौक परिसरात नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर दुपारी बरोबर १२ वाजता दत्त मंदिरात महिलांनी पाळणा म्हणत भक्तिमय वातावरनात गुलाल उधळण करण्यात आली. यावेळी उपस्थित भक्तजनांना महाप्रसादाचे वाटप करून दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्त मंदिरचे गंगाधर गंगणे, शिवाजी सुर्यवंशी, धोंडीराम कुलकर्णी, दीपक गंगणे, सुरेश संगापुडे, गोवर्धन गंगणे, प्रेमनाथ घोलप, व्यंकट फुले, बालाजी साबणे, शिवानंद गंगणे, चंद्रप्रकाश बगडे, शरद मंत्री, गणेश घोडके, विनोद गंगणे, राजकुमार होकरणे, सुरज मुळे, राम पांढरे, गणेश काथवटे, अमोल गायकवाड, रेखाबाई बाबर, केवळबाई घोलप, सुशिलाबाई गंगणे, केशरबाई कांबळे, अलापुरे बाई , चंदाताई मंत्री, रेखा कुंभार, नंदाताई मुळे यांनी परिश्रम घेतले.

