29.9 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeलातूरमहापूर-हरवाडी पाटी येथे रस्ता रोको

महापूर-हरवाडी पाटी येथे रस्ता रोको

रेणापूर :  प्रतिनिधी
मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा संघर्षयोध्दा  मनोज  जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे ८ जूनपासून आमरण उपोषण सुरू केले या उपोषणास पांिठबा दर्शविण्यासाठी तसेच सरकारने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात यासाठी रेणापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर- अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील महापूर-हरवाडी पाटी येथे गुरुवारी दि.१३ जून रोजी आडीच ते तीन तास  रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागून व वाहतूक ठप्प झाली होती .
मराठा समाजास आरक्षण मिळणेसाठी मराठा संघर्षयोध्दा  मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या ६ दिवसापासून (८ जून) अंतरवली (सराटी) ता. अंबड येथे अमरण उपोषण सुरू केले मात्र शासनाने दखल घेतली नाही दरम्यान मनोज  जरांगे पाटील याची प्रकृती दिवसेंदिवस बिडत चालली  आहे. त्यांच्या या उपोषणाच्या समर्थनार्थ तसेच सगेसोयरे अधिसुचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, मराठा कुणबी एकच आहेत त्याचा अध्यादेश काढण्यात यावा ,सुडाचे भावनेतून हजारो मराठा आंदोलकावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळमागे घेण्यात याव्यात, हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेट लागू करण्यात यावा, शिंदे समितीस मुदतवाढ देवुन समितीचे काम सुरु ठेवावे ज्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे त्याचा डाटा प्रसिध्द करण्यात यावा ,
जातीय तेढ निर्माण करण्याच्या वाईट उद्देशाने सोशल मिडीयावर व जाहीर सभेमध्ये आक्षेपार्ह  विधान करणा-या व्यक्तीवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, जात पडताळणी समिती, लातूर येथील मराठा कुणबी, कुणबी मराठा व कुणबी प्रमाणपत्राची पडताळणी लवकरात लवकर करुन देण्यात यावी. तसेच  लातूर येथील जात पडताळणी समितीस सूचित करून  मुळ रेकॉर्ड वारंवार न बोलावता एकदाच बोलावुन स्कॅन करुन घ्यावे, गृह चौकशी अहवालाची कामे तलाठी व मंडळ अधिकारी यांना तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावेत यासह विविध मागण्यासाठी रेणापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील महापूर – हरवाडी पाटीयेथे अशा स्वरूपात  गुरुवारी दि . १३ जून रोजी आडीच ते तिन तास  रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या  आंदोलनामुळे दूर दूरवर वाहनांच्या रांगा लागून व वहातूक ठप्प झाली होती .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR