27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeलातूरमहापौर आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारला

महापौर आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारला

लातूर : प्रतिनिधी
नूतन महापौर आणि उपमहापौर लातूर शहर महानगरपालिकेत, पारदर्शक, लोकाभिमुख, आणि गतिमान कारभार करतील. निवडणुकीपूर्वी लोकांच्या सूचना घेऊन काँग्रेस वंचित बहुजन आघाडीने जो ‘जनतेचा जाहीरनामा’ प्रसिद्ध केलेला आहे, त्याची काटेकोर अंमलबजावणी नूतन पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक मिळून करतील. जनतेला सर्व प्रकारच्या मूलभूत सोयी सुविधा विना तक्रार पोहोचवतील, संकल्पित योजनांना गती देतील, असा विश्वास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
लातुर महानगरपालिका निवडणूक निकाल नुकतेच लागल्यानंतर काँग्रेस आघाडीला मनपात एकहाती सत्ता मिळाली असून लातुर मनपाच्या महापौर पदी सौ. जयश्री भालचंद्र सोनकांबळे तर उप महापौरपदी अ‍ॅड. स्नेहल श्रीकांत उटगे यांची बिनविरोध निवड सोमवारी करण्यात आली होती. मंगळवार दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी लातूर शहर महानगरपालिकेत लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. जयश्री  सोनकांबळे व उपमहापौर अ‍ॅड. स्नेहल उटगे यांचा पदभार स्वीकृती सोहळा झाला. याप्रसंगी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिका-यांसह लातूर शहर महानगरपालिकेत उपस्थित राहुन दोघांचेही मन:पूर्वक अभिनंदन केले, त्यांच्या आगामी कारकिर्दीस माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलातांना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नूतन महापौर व उपमहापौरांचा यथोचित सन्मान करून त्यांना येणा-या काळात लातुर महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ, पारदर्शक, आणि लोकाभिमुख कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी मीना, उपायुक्त वसुधा फड, लातूर शहर महानगरपालिकेचे गटनेते विजयकुमार साबदे, माजी महापौर-प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, माजी महापौर, नगरसेवक दीपक सुळ, माजी उपमहापौर कैलास कांबळे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन गायकवाड, श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस  चेअरमन सचिन पाटील,
ट्वेन्टीवन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. समद पटेल, भालचंद्र सोनकांबळे, प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, लक्ष्मीकांत मंठाळे, सुनील बसपुरे, बसवंतआप्पा भरडे, तबरेज तांबोळी, संजय निलेगावकर, सायरा पठाण, विष्णुदास धायगुडे, मीना टेकाळे, गणेश एस. आर. देशमुख, व्यंकटेश पुरी, प्रविण सुर्यवंशी, अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे, गोरोबा लोखंडे, बिभीशन सांगवीकर, राजू गवळी,  इनायत सय्यद, सिकंदर पटेल, दगडूआप्पा मिटकरी, हारून शेख, आयुब मणियार, नामदेव ईगे, यशवंत वाडीकर, बालाप्रसाद बिदादा, दत्ता सोमवंशी, डॉ. दिनेश नवगिरे, सूर्यकांत  कातळे, शैलेश भोसले, रमेश बिराजदार, पवनकुमार गायकवाड, अमित जाधव, गोविंद सोदले, मुक्तार शेख, आबेद गोलंदाज, युनूस शेख, आबु मणियार, करीम तांबोळी, अब्दुल्ला शेख आदिसह लातूर शहर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्ष नगरसेवक, वंचित बहुजन आघाडीचे सर्व नगरसेवक, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, लातूर शहर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR