28 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeपरभणीमहापौर पदासाठी ठाकूर, खोबे, माजुलाला, देशमुख यांची दावेदारी

महापौर पदासाठी ठाकूर, खोबे, माजुलाला, देशमुख यांची दावेदारी

खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण सुटल्याने स्पर्धा वाढली

सुधीर गो. बोर्डे
परभणी : राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत गुरूवार, दि.२२ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. यात परभणी महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण खुल्या गटा करीता आरक्षीत झाले आहे. त्यामुळे महापौरपदी आता कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर पदाच्या स्पर्धेत उबाठाचे दिलीपसिंग ठाकुर, श्याम खोबे, माजुलाला आणि काँग्रेसचे गणेश देशमुख यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.

राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी मुंबईत मंत्रालयात सकाळी १ वाजता नगरविकास विभागाचे राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत काढण्यात आली. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका दि.१५ जानेवारी रोजी पार पडल्या होत्या. या निवडणुकीची मतमोजणी दि.१६ जानेवारी रोजी पार पडली होती. परभणी शहरात उबाठासह व काँग्रेस महाविकास आघाडीने तब्बल ३७ जागांवर यश मिळवत महापालिकेत एकहात्ती सत्ता मिळवली आहे.

परंतू महापौरपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने सर्वच पक्षाचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले होते. महापौरपदाची आरक्षण सोडत गुरूवारी जाहीर झाली असून परभणीचे महापौरपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी सुटले आहे. त्यामुळे महापौरपदी आता कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून इच्छूकांनी आपापल्या परीने फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR