बीड : प्रतिनिधी
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांची कॉलर पकडणे, डांबून ठेवणे, दमदाटी करणे हे प्रकार सर्रास करण्यात आले आहेत. बिहारमध्ये जंगलराज आहे, असा आरोप करणा-या भाजपा महायुतीचा महाराष्ट्रात नंगानाच सुरू असून त्यांनी लोकशाहीला काळिमा फासला आहे. त्यामुळे महायुतीच्या या गुंडगिरी, भ्रष्टाचार आणि विकृत राजकारणाला मूठमाती द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी, दंडेलशाही करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांची कॉलर पकडणे, डांबून ठेवणे, दमदाटी करणे हे प्रकार सर्रास करण्यात आले आहेत. बिहारमध्ये जंगलराज आहे, असा आरोप करणा-या भाजपा महायुतीचा महाराष्ट्रात नंगानाच सुरू असून त्यांनी लोकशाहीला काळिमा फासला आहे. त्यामुळे महायुतीच्या या गुंडगिरी, भ्रष्टाचार आणि विकृत राजकारणाला मूठमाती द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बीडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, बीड जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाने उच्छाद मांडला आहे. त्यांच्या गुंडगिरीने बीड जिल्ह्याचे नाव बदनाम झाले आहे. ही विकृती आता थांबवली पाहिजे. यासाठी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत ताकदीने लढत आहे. मात्र दुसरीकडे महायुतीमधील पक्ष आपापसांत लढत आहेत. गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये सध्या टोळीयुद्ध सुरू असून जनतेमध्ये सत्ताधारी महायुतीविरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीसाठी उत्साह असून बीडसह मराठवाड्यातही काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली होईल, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.

