23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeउद्योग‘महारत्न’ कंपन्यांनी भरली सरकारची झोळी, दिला हजारो कोटींचा डिविडेंड

‘महारत्न’ कंपन्यांनी भरली सरकारची झोळी, दिला हजारो कोटींचा डिविडेंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जून तिमाहीत लाभांश जाहीर करणा-या कंपन्यांकडून आता तो सरकारला दिला जात आहे. दीपमनं दिलेल्या माहितीनुसार ‘एनटीपीसी’ अर्थात नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने लाभांश म्हणून सरकारी तिजोरीत १६१० कोटी रुपये जमा केले आहेत. याशिवाय कोल इंडियाने सरकारी तिजोरीत लाभांश म्हणून १९४५ कोटी रुपये दिले आहेत. दोन्ही कंपन्यांनी मिळून ३५५५ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले.

‘एनटीपीसी’चा डिविडेंड यील्ड २% आहे. म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने ‘एनटीपीसी’च्या शेअरमध्ये १० हजार गुंतवले तर त्याला एका वर्षात डिविडेंडच्या रुपात २०० रुपयांच्या जवळपास मिळतील. याचा डिविडेंड पे आऊट रेश्यो ३९.५% आहे. म्हणजे कंपनी आपल्या नफ्याच्या ४० टक्के डिविडेंडच्या रुपात शेअर होल्डर्समध्ये वाटते.

‘कोल इंडिया’चा डिविडेंड यील्ड ५.२५% आहे. याचाच अर्थ जर एखाद्याने या स्टॉकमध्ये १० हजार गुंतवले असतील तर त्याला प्रत्येक वर्षी डिविडेंडच्या रुपात ५२५ रुपयांच्या जवळपास मिळतील.

दीपमने दिलेल्या माहितीनुसार, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशननेही सरकारी तिजोरीत १३१३ कोटी रुपये जमा केले आहेत. यापूर्वी ‘पीएफसी’ म्हणजेच पॉवर फायनान्स कंपनीने ६०१ कोटी रुपये, कॉनकॉरने ६८ कोटी रुपये आणि राइट्स लिमिटेडकडून ४३ कोटी रुपये लाभांश म्हणून देण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR