24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeलातूरमहाराणा प्रतापनगरला सहा महिन्यांत घरणीहून पाणी आणू -आमदार अमित देशमुख

महाराणा प्रतापनगरला सहा महिन्यांत घरणीहून पाणी आणू -आमदार अमित देशमुख

लातूर : प्रतिनिधी
महाराणा प्रतापनगरसाठी पिण्याचे पाणी आवश्यक आहे. ही बाब आम्ही लक्षात घेवून या भागासाठी पाणी आणण्याचे आम्ही प्रयत्न करीत असताना नतद्रष्ट भाजपने आमच्यावर पाणी पळविले जात असल्याचा आरोप केला. आता याना धडा शिकवण्याची वेळ आली असून यांनी कितीही प्रयत्न केले असले तरी येणा-या ६ महिन्यात घरणीहुन महाराणा प्रतापनगरसाठी पाणी आणण्याकरीता सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले.
लातुर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ निमित्ताने  महाराणा प्रतापनगर जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार महादेव प्रभाकर मस्के, पंचायत समिती गणातील उमेदवार प्रिया उफाडे आणि बाभळगाव पंचायत समिती गणातील उमेदवार पूजा नितीन जाधव यांच्या प्राचारार्थ म्हाडा कॉलनी बाभळगाव रोड येथे दि. २७ जानव्ोारी रोजी आयोजित सभेत माजी मंत्री, आमदार अमित देशमुख बोलत होते.
बोलताना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले, आज महाराणा प्रतापनगरमध्ये येण्याचा योग आला. याचा मनस्वी आनंद असून एकेकाळी छोटेसे असलेले महाराणा प्रतापनगर आणि आजचे वाढलेले महाराणा प्रतापनगर यात खूप मोठा फरक पडलेला आहे. कारण काळानुसार या भागाचा चांगलाच विस्तारदेखील झाला आहे. महाराणा प्रतापनगरची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ हे आज बाभळगाव पेक्षा आधीक
वाढले असून एक वेगळे महत्व या गावाला प्राप्त झाले असून याचा मनस्वी आनंद तर आहेच शिवाय एकीकडे लातुर मनपा आणि दुसरीकडे बाभळगाव आणि दोन्हीच्यामध्ये असलेले महाराणा प्रतापनगर अतिशय सुरक्षित आहे, हा विचार त्या काळी  आदरणीय विलासराव देशमुख साहेबानी आपल्या बाबतीत केलेला होता हे विसरून चालणार नाही.
येणा-या काळात महाराणा प्रतापनगर करिता आवश्यक स्मशानभूमी, येथील नागरिकांची घरे जुनी झाली असून यासाठी एक सर्व्हे करून नव्याने घरकुल बांधून देणे, मुस्लिम समाजास शादिखाना व वाचनालय मागणी असून आपण जागा सुचवावी यासाठी निश्चि प्रयत्न केले जातील. येथील नालेसफाई व कचरा व्यवस्थापन होत नाही. यासाठी ग्रामपंचायत व खाजगी व्यवस्थापन करणा-या संस्था यांच्याशी बोलून याचे व्यवस्थापन करावे लागेल. ज्या निराधार व्यक्तीला अजूनही अनुदान नाही अशाचे अर्ज आपण भरून घेऊ आणि लवकरात लवकर त्यांचे निराधार अनुदान सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. लाडकी बहीण ही कुठल्या एका पक्षाची योजना नसून ती सरकारची योजना आहे. त्यामुळे या योजनेपासून वंचित असलेल्या लाडक्या बहिणींनी चिंता करण्याची गरज नसून ही योजना यापुढेही सुरूच राहणार असून ज्या वंचित लाडक्या बहिणीना या योजनेत सामावून घेण्यासाठी आणखीन प्रयत्न केले जावेत, आशा सूचना स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यानी केल्या.
 आजवर जे कांही केले ते काँग्रेस पक्षाने केले असून यापुढेही विकास योजना आणि आपल्यासाठी जे कांही करायचे आहे ते केवळ काँग्रेस पक्षच करेल, असे म्हणत भाजप हा भ्रष्टाचाराणे बरबटलेला पक्ष आहे. या सरकारच्या प्रशासक राज काळात केवळ भ्रष्टाचारच सर्वत्र वाढला असून याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपली व आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती व्हावी, आपल्या मुलांना चांगले उच्च शिक्षण  शिक्षणासाठी पॅटर्न असलेल्या लातूरमध्येच व्हावे यासाठी येणा-या काळात प्रत्येक गावात एक मुलींसाठी व एक मुलांसाठी आशा स्वतंत्र अभ्यासिका करायच्या असून यासाठी येथील ग्रामपंचायतीने केवळ जागा उपलब्ध करून द्यावी, महिलांना गारमेंट उद्योग, बचत गटाच्या व स्व संरक्षण, विविध लहान मोठे उद्योग यासाठी येणा-या काळात विलासराव देशमुख फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक महिला ही सक्षम व्हावी यासाठीदेखील आवश्यक प्रशिक्षण देऊन महिला भगिणीना त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असून  महाराणा प्रताप यांच्या नावाला साजेसे असे महाराणा प्रतापनगर आपल्याला करायचे आहे यासाठी आपली साथ या निवडणुकीत अत्यंत महत्वाची असून हे युद्ध आहे आणि ते जिंकण्यासाठी आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपल्याला करायचे आहे, असेही आमदार अमित देशमुख या वेळी म्हणाले.
यावेळी डॉ. दिनेश नवगिरे, हरिभाऊ गायकवाड, प्रा. हरिभाऊ जवळगेकर, प्रवीण पाटील यांनी उपस्थित मतदारांच्यासमोर मनोगत व्यक्त करीत महाराणा प्रतापनगर जिल्हा परिषद गटातील व गणातील काँग्रेस आघाडीच्या सर्व उमेदवाराना भरभरून मतरुपी आशीर्वाद देऊन विजयी करावे आणि सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली. यावेळी समद पटेल, उपसरपंच गोविंद देशमुख, माधव गंभीरे, राम स्वामी, संगीता पतंगे, राजकुमार पवार, एन. ए. इनामदार, तुकाराम आडे, दिलीप हरणे, संजय ओहोळ, संजय सप्ताळ, सूर्यभान रकटे, हरिश्चंद्र कांबळे, बालाजी चौरे यांच्यासह महाराणा प्रतापनगर जिल्हा परिषद गट व गण यासह बाभळगाव गणातील मतदार, काँग्रेस आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR