15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeक्रीडा‘महाराष्ट्राची हिरकणी’ म्हणून जिम्नॅस्ट संयुक्ता काळे सन्मानित

‘महाराष्ट्राची हिरकणी’ म्हणून जिम्नॅस्ट संयुक्ता काळे सन्मानित

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राची युवा रिदमिक जिम्नॅस्ट संयुक्ता प्रसेन काळे हिची वर्ल्ड रिदमिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप २०२५, रिओ-दि-जानेरो (ब्राझील) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक कल्याण मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी संयुक्ताशी दूरध्वनीवरून संवाद साधत तिला शुभेच्छा दिल्या.

या संभाषणात मंत्री कोकाटे यांनी ‘महाराष्ट्राची हिरकणी’ असा संयुक्ताचा गौरव करत तिच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीनेही तिला शुभेच्छा दिल्या. संयुक्ताच्या पालकांसह प्रशिक्षक मानसी गावंडे आणि पूजा सुर्वे यांचेही अभिनंदन करण्यात आले. खेळासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांसाठी थेट फोन करण्याचे आवाहनही मंत्री कोकाटे यांनी केले.

संयुक्ता ही या जागतिक स्पर्धेसाठी भारतातून निवड झालेली एकमेव जिम्नॅस्ट असून ती पाचव्या वर्षापासून फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकादमी, ठाणे येथे प्रशिक्षण घेत आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कार विजेती पूजा सुर्वे यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.
आजवर संयुक्ताने इंडिया युवा खेळ, राष्ट्रीय व इतर स्पर्धा मिळून १५० पदकं (१२५ सुवर्ण) जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ७ वा क्रमांक मिळवत आंतरराष्ट्रीय पातळीवरही ठसा उमटवला आहे. याच स्पर्धेत मानसी गावंडे यांची भारताच्या संघाच्या प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR