महाराष्ट्रातील लोककला साधू संतांच्या संगतीत जगली 

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या पूर्वापार चालत आलेल्या लोककला या संतांच्या संगतीत जगल्या, असे नमुद करुन लोककला अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी भारुड, ओव्या, गोंधळ, पोवाडा, शेतकरी गीत अशा विविध कलाप्रकारांची इत्यंभूत माहिती व महती उपस्थित प्रशिक्षणार्थीना सांगितली.
बालरंगभूमी परिषद लातूर शाखा व राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लोककला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राजर्षी शाहू महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन लोककला अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, तर प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, प्रा. दीपक वेदपाठक, प्रा. ओमप्रकाश झुरळे आदी उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत डॉ. चंदनशिवे यांनी लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य व लोकवाद्याविषयी प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. गव्हाणे यांनी लातूरच्या कलासंस्कृतीचा आढावा घेत नव्या पिढीला लोककला आकलन होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे म्हणाले, लातूर सर्व स्तरातील सांस्कृतिक भूक असलेलं शहर आहे. नव्या पिढीवर कलासंस्कार करण्यास बालरंगभूमी परिषद व आम्ही सदैव सक्रिय आहोत.  ५७८ बाल कलाकारांनी सहभाग घेतलेली ही कार्यशाळा हलगी, संबळ, ढोलकी, दिमडी, टाळाच्या तालात अगदी जल्लोषात झाली. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. नवलाजी जाधव यांनी केले, आभार लातूर शाखा अध्यक्ष रणजित आचार्य यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. सूर्यकांत चव्हाण यांनी केले.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. वैभव माने, लोककला महोत्सव समितीचे प्रमुख मयूर राजापूरे, हिरा वेदपाठक, रवी अघाव, रवीकिरण सावंत, विशाल वाटवडे, सुमती बिडवे-सोमवंशी, महेश पवार, महेश बिडवे, प्रिती ठाकूर, तेजश्री घवले, सलीम शेख, वसुधा पाटील, तन्मय रोडगे, प्रा. हरी कुंभार, आनंत खलुले, ओम भंडारे, शरीफ पठाण, ऋतुराज सुरवसे, पृथ्वीराज चव्हाण, यश कांबळे, आदित्य पवार, कृष्णा शिंदे, अश्वराज ढोरमारे, राम रेड्डी, आकाश बाभळे, महेक अन्सारी, मयुरी वाघमारे, नैतिक बिराजदार, आर्यन गिरलकर, बालाजी डोनेराव आदींनी परिश्रम घेतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55

Latest news