26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील सगळे पक्ष देवाभाऊ चालवतात : मंत्री मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्रातील सगळे पक्ष देवाभाऊ चालवतात : मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ला शपथ घेतली. तेव्हा भाजप राज्यात मजबूत स्थितीत नव्हती. पण आज परिस्थिती अशी आहे की भाजप हा पूर्ण देवाभाऊंचा आहेच पण महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष कसे चालणार हे देखील देवाभाऊच ठरवतात, असे वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
लोढांनी त्यांच्या पक्षाची राजकीय संस्कृती सांगितली असेल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. अजितदादा आमचा पक्ष चालवतात. दुस-यांना आमचा पक्ष चालवण्याची गरज नाही.

लोढा म्हणाले, मी २५ वर्षांपासून देवाभाऊंसोबत विधानसभेत बसत आहे. राजकीय नेते म्हणून ते कसे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र, ते व्यक्ती म्हणून कसे आहेत हे मी सांगतो. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला ते कुटुंबातील व्यक्ती मानतात. कौटुंबिक संकटाच्या काळात ते मदतीसाठी येतातच.
राज्यातील सर्व पक्ष देवाभाऊ चालवतात, लोढांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्त्या आहे. आमचा पक्ष हा आमचे कार्यकर्ते आणि अजितदादा पवार चालवतात. लोढा जे बोलले ते त्यांच्या पक्षातील संस्कृतीविषयी बोलले असतील.

शिंदेंच्या शिवसेनेचे प्रत्युत्तर
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, लोढांचे मत हे वैयक्तिक असू शकेल. आमची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या म्हणण्याने चालते. आमचा पक्ष कोणाच्या म्हणण्याने चालत नाही. आमच्या पक्षाची तत्त्वे, अजेंडा वेगळा आहे. आम्ही क्रांती केली त्यामुळे भाजपचे महायुतीचे सरकार राज्यात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR